Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुटलेल्या वीज वाहक तारेने चार बालकांचा मृत्यू
सामाजिक

तुटलेल्या वीज वाहक तारेने चार बालकांचा मृत्यू

संगमनेरच्या खंदरमाळवाडी मधील अंतकरण हेलावणारी दुर्दैवी घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2022Updated:08/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
उच्च दाबाची वीजवाहक तार तुटून पडल्यामुळे या तारेचा धक्का लागून चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला. सख्खी भावंडे यात मृत्युमुखी पडल्याने तालुक्याच्या पठार भागात शोककळा पसरली.संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या नांदूर खंदरमाळवाडी गावात ही घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली. ओमकार अरुण बर्डे (वय १० वर्ष’ अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्षे) आणि विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) अशी या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळाली.महसूल प्रशासनाने या घटनेची दखल घेत तातडीने संबंधितांना सूचना केल्या घडलेला प्रकार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविण्यात आला असून महावितरणचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते. तालुक्यातील पठार भागात असलेल्या घारगाव नजीकच्या खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथे असलेल्या एका छोट्या तळ्यात आंघोळीसाठी हे चारही भावंड गेली होती. यावेळी तेथे तुटलेल्या विज वाहक तारेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने त्यांना धक्का लागला. त्या पाण्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.दुर्दैवी घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक फौजदार राजू खेडकर, पोलीस कर्मचारी राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे आदींसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चारही भावंडांचे मृतदेह तळ्यातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शव विच्छेदनासाठी संगमनेरला आणण्यात आले असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

तलावाकडे जाणारा रस्ता पावसामुळे अतिशय खराब झाला असून या खराब रस्त्यामुळे चारही बालकांचे मृतदेह झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले. नागरिकांनी वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. दुर्दैवी घटनेत एकाच वेळी चार बालकांचा मृत्यू झाल्याने संगमनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बालकांच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी असलेल्या अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 242
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.