Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची खासदार लोखंडे यांची मागणी
सामाजिक

चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची खासदार लोखंडे यांची मागणी

मुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या भेटीनंतर मदत जाहीर करण्याची शक्यता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात रविवारी सायंकाळी सात वाजता ते मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्षात भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.पाण्यात पडलेल्या उच्च दाबाच्या वीज तारेचा प्रवाह छोट्याशा तळ्यातील पाण्यात उतरल्याने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्ष), ओंकार अरुण बर्डे (वय १० वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) व विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष) या चार भावंडांचा शनिवारी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला असून वीज वितरण कंपनी विरोधात या परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.खंदरमाळवाडी परिसरात मोल मजुरी करणारे गरीब आदिवासी बर्डे भावंड रहात असून शनिवारी या दोघा भावंडांची चार मुले वांदरकडा येथे घराजवळ असलेल्या एका नालासदृश्य छोट्या तळ्यात आंघोळीसाठी गेली होती. यावेळी तेथे तुटलेल्या विज वाहक तारेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या चारही भावंडांना विजेचा जोराचा धक्का लागला. त्या पाण्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने ईमेलद्वारे ही माहिती कळविली. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी या पत्राद्वारे लोखंडे यांनी केली आहे. रविवारी खासदार मुंबईत असल्याने सायंकाळी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मृताच्या वारसांना मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 124
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.