Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सेवा पंधरवड्यातील संगमनेर उपविभागाची कामगिरी आली समोर
प्रशासन

सेवा पंधरवड्यातील संगमनेर उपविभागाची कामगिरी आली समोर

उल्लेखनीय कामगिरी करत १९५२३ प्रकरणांचा केला निपटारा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यात संगमनेर महसूल उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंधरा दिवसाच्या या कार्यकाळात तब्बल १९५२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. विकासाचे विविध उपक्रम राबवण्यासोबत प्रशासन जनतेचे प्रश्न, तक्रारी निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असते. पण, अनेक प्रकरणात काही कारणामुळे किंवा काही शुल्लक चुकांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असतात; नियमित प्रक्रियेत मागे पडतात. यामुळे संबंधिताना व्यवहारात अडचणी येऊ शकतात, अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचा संगमनेर महसूल उपविभागाने पुरेपूर उपयोग करून घेतला.या पंधरवड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत, पंतप्रधान किसान सन्मान निधी, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये अर्ज, शेतरस्ते, तुकडेजोड व तुकडेबंदी नियमितीकरण, वय,राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, तात्पुरता रहिवास दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, अधिकार अभिलेखची प्रमाणित प्रत, अल्पभूधारक दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, डोंगर/दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचा दाखला, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे आदी प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्यात आला. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेलेल्या या मोहीमेत संगमनेरमध्ये १३५५८ तर अकोले तहसीलमध्ये ५९६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

‘‘संगमनेर तहसीलस्तरावर प्राप्त प्रकरणांचा दैंनदिन निपटारा करण्यात येतो. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहत नाहीत. सेवापंधरवड्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे हयातीचे दाखले थेट गावातच उपलब्ध करून देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. यात दोन दिवसातच यंत्रणेच्या सांघिक मेहनतीमुळे २९३३ हयातीचे दाखले ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले. संगमनेर तहसीलच्या कामगिरीमुळे लाभार्थ्यांना सुखद धक्का बसला. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटून गेले.’’
अमोल निकम, तहसीलदार संगमनेर.

‘‘अकोले तालुक्यात वय,राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर या शैक्षणिक कागदपत्रांचा प्राधान्याने तत्परपणे निपटारा केल्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शासनाबद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे.’’
सतीश थेटे, तहसीलदार अकोले.

‘‘सेवा पंधरवड्यात महसूल विभागाशी संबंधित व तालुका प्रशासनाची निगडीत विविध लोकोपयोगी कामांचा जलद निपटारा करण्यास प्राधान्ये देण्यात आले. यापुढे ही नागरिकांना लोकाभिमुख व जलद सेवा देण्यावर भर राहील.’’
डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांत अधिकारी.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 146
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.