Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे कालव्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
शेती व सहकार

निळवंडे कालव्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

निळवंडे कालव्याच्या आढाव्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

बहुचर्चित ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे तातडीने डिसेंबर अखेर पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत निळवंडे कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीसाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. जवळपास ८३ गावातील लाभार्थ्यांना या पाण्याचा लाभ मिळणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनीबाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली. खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करून लाभार्थ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते जास्तीचे मनुष्यबळ देखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सांगितले. तसेच अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

निळवंडेवरुन रंगणार श्रेयवाद

“निळवंडे धरण आणि कालव्यांच्या प्रश्नावरुन तत्कालिन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु असतांना खासदार सदाशिव लोखंडेदेखील या श्रेयवादाच्या लढाईत उतरले आहेत. मुंबईत लोखंडे यांच्या उपस्थित मुख्यमंत्र्यांनी निळवंडेच्या कामाचा आढावा घेतल्याने निळवंडे कालव्यातील पाणी ऐन दीपावलीच्या काळात राजकीयदृष्ट्या चांगलेच तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुर्णत्वास गेलेले धरण आणि आता अंतिम टप्प्यात आलेले कालवे याचे खरे श्रेय कोणाकडे जाते हे सर्वांनाच माहिती असले तरी आता निळवंडेवरुन राजकीय बाण मारण्याची संधी कोणीच सोडणार नसल्याची चिन्हे आहेत”.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 207
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.