Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अधिकारी जोपासत आहेत वाचन छंद..!
महाराष्ट्र संवाद विशेष

अधिकारी जोपासत आहेत वाचन छंद..!

वाचनाने निर्णय प्रक्रियेत येते गतिमानता; अधिकाऱ्यांच्या भावना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

वाचन प्रेरणा दिन विशेष
प्रशासकीय कामांच्या रहाटगाड्यात अनेक अधिकारी वेळात वेळ काढून आपला वाचन छंद जोपासत आहेत. “शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. मनाला स्थिर, सजग ठेवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासणंही गरजेचं आहे. वाचनाने जीवनाप्रती सजगता येऊन कामात सकारात्मकता येते. दैंनदिन कामात ऊर्जा येते. निर्णय प्रक्रियेत गतिमानता येते”, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आजपर्यंत केलेले वाचन, सध्या वाचन असलेले पुस्तक व एकूण वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याचा शिर्डी माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतलेला हा आढावा महाराष्ट्र संवाद न्यूज वेब पोर्टलवर खास आपल्यासाठी…

वाचनाबद्दल अधिकारी म्हणतात …

दैंनदिन महसूली काम करतांना वाचन करण्यासाठी तसा वेळ अभावानेच मिळतो. मात्र तरीही वृत्तपत्रातील महत्त्वपूर्ण अग्रलेख, स्तंभलेखांचे नियमित वाचन करत असतो. मोबाईलच्या माध्यमातून प्रवासात असतांना ही काहीतरी वाचन होत असते. आजच्या सोशल मिडियाच्या जगात मोबाईलपासून थोडा वेळ काढून प्रत्येकानं काहीतरी वाचन करण क्रमप्राप्त आहे.
गोविंद शिंदे, शिर्डी उपविभागीय अधिकारी

नियमित बैठक देऊन वाचन होत नाही. पण महिने-सहा महिन्यातून जसा वेळ मिळेल तसे पुस्तक खरेदी करून वाचन करत असतो. ‘अॅटलास श्रग्गड’ हे आयन रँड लिखित मुग्धा कर्णिक यांनी अनुदानित केलेले पुस्तक नुकतेच वाचलं. या पुस्तकात जीवनाच्या अप्रतिम तत्वज्ञानाची मांडणी लेखिकेने केली आहे.
कुंदन हिरे, राहाता तहसीलदार.

भारताच्या इतिहासाबद्दल जास्त वाचन केलं आहे. पूर्वी इंग्रजी पुस्तके जास्त वाचायचो. आता वपु, पुलं, नेमाडे, सुहास शिरवळकर, सुधा मूर्ती, रंगनाथ पठारे, अनिल अवचट, प्रकाश संत अशा अनेक मराठी लेखकांचं लिखाण मी वाचत असतो.  मी गेल्या काही दिवसांत प्रा. रंगनाथ पठारे यांचे ‘सातपाटील कुलवृत्तांत’, ‘टोकदार सावलीचे वर्तमान’ आणि शरद तांदळेंचं ‘रावण राजा राक्षसांचा’ ही पुस्तके वाचली आहेत. ‘सातपाटील’ या पठारे सरांच्या पुस्तकाने मी खूप झपाटून गेलो. अवजड दिसणाऱ्या या पुस्तकात लेखकानं खूप कलात्मकतेनं व उत्कंठावर्धक शैलीत कथानक गुंफलं आहे.

अमोल निकम, तहसीलदार संगमनेर.

लहान असताना वाचलेल्या चांदोबा, चंपक, छोटा दोस्त, इंद्रजाल कॉमिक्सपासून आजवर शिवाजी सावंत, पुल, वपु, विस इत्यादी महनीय लेखकांची अनेक पुस्तकं वाचली आहेत. या सर्व वाचनाने मला मिळालेली प्रेरणाच सातत्याने चांगल काम करण्याची ऊर्जा बनली आहे. शिवाजी सावंत साहेबांची ‘मृत्युंजय’ मला कल्पनाशक्ती व भाषा सौंदर्याचा नितांत सुंदर आविष्कार वाटतो. तर वपुंची लेखणी मला जणू एका महान मनोवैज्ञानिकाचे दर्शन घडवत असते. ‘आपण सारे अर्जुन, गोष्ट हातातली होती, वपुर्झा ही माझी आवडती पुस्तकं आहेत.

प्रशांत पाटील, श्रीरामपूर तहसीलदार.


महाविद्यालयीन जीवनात ऐतिहासिक आणि राजकीय साहित्य वाचायला आवडायचे. हल्ली कार्यालयीन कामाच्या व्यापामुळे वाचनासाठी कमी वेळ मिळतो. मात्र उपलब्ध वेळेत कर्मचारी व्यवस्थापन, शिक्षण, रोजगार, ग्रामविकास या विषयाशी संबंधित साहित्य प्राधान्याने वाचतो. नव्या पिढीतील आवडते लेखक अच्युत गोडबोले, संजय आवटे यांच्यासह द्वारकानाथ संझगिरी यांचे प्रासंगिक लेख आवर्जून वाचतो. वाचनामुळे कायम नवी उभारी मिळते.

सचिन सुर्यवंशी, गटविकास अधिकारी कोपरगांव-राहाता.

 

अविनाश धर्माधिकारी लिखित ‘७५ सोनेरी पाने’ हे पुस्तक वाचनात आले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपली जी प्रगती झाली. त्यातील ७५ महत्वाच्या घटनांवर भाष्य करणारे हे पुस्तक सर्वानी वाचलचं पाहिजे, असं झालं आहे. भविष्याकडे पाहताना आपला इतिहास डोळ्यासमोर असावा लागतो. एक भारतीय नागरिक म्हणून अभिमान वाटावा. अशा घटना अविनाश धर्माधिकारींच्या नजरेतून पाहणे हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे.

अनिल नागणे, गटविकास अधिकारी, संगमनेर.



कोणत्याही व्यक्तीच्या वैचारिक जडणघडणीमध्ये वाचन या प्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्त्व असते. माझेही शालेय तसेच सेवाकाळातील आयुष्य विविध प्रकारच्या साहित्यकृतींनी समृध्द केलेले आहे. बाबुराव बागुल, गुलजार, आरती प्रभू, रंगनाथ पठारे हे आवडते लेखक-कवी आहेत. सध्या गिरीश कुबेर यांचे ‘एका तेलियाने’चे वाचन सुरू आहे.

विक्रम जगदाळे, मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 246
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.