Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी थोरात कारखान्याकडून ऊस उत्पादक व कामगारांसाठी 26 कोटी रुपये
शेती व सहकार

सहकार महर्षी थोरात कारखान्याकडून ऊस उत्पादक व कामगारांसाठी 26 कोटी रुपये

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची घोषणा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची सहकार क्षेत्रात लौकिकास्पद वाटचाल सुरू आहे. गतवर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप करत चांगला भाव दिला होता. यावर्षी देखील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176 रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून दिले जाणारे ऊस उत्पादक व कामगारांसाठीचे 26 कोटी रुपये बाजारात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, रामहरी कातोरे, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. थोरात म्हणाले, निळवंडे कालव्याच्या कामाला आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळात गती दिली. दीपावली पाडव्याला कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. मात्र सरकार बदलामुळे आता या कामाची गती मंदावली आहे. असे असले तरी यापुढील काळात हे पाणी कोणीही थांबवू शकणार नाही. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सरकारने घोषणा करण्याऐवजी थेट शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याची गरज आहे. थोरात कारखान्याचा कारभार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वावर सुरू आहे. यामुळे देश पातळीवर कारखान्याचा वेळोवेळी गौरव झाला. दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176/- रुपये प्रति टन याप्रमाणे पैसे बँकेत वर्ग केले जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रति टन 2626/- रुपये भाव मिळेल. त्यासाठीचे अतिरिक्त अनुदान 14 कोटी रुपये, ठेवीवरील व्याज दोन कोटी रुपये आणि कामगारांचा बोनस 10 कोटी रुपये असे 26 कोटी रुपये या निमित्ताने बाजारात येतील. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचेही भाषणे झाली. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

 

राजहंस दूध संघाकडून देखील एक रुपया रिबेट

ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करणाऱ्या राजहंस दूध संघाने कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केली. दूध संघाकडून सर्वाधिक 35 रुपये लिटर प्रमाणे भाव दिला जात असून 16 ऑक्टोंबर पासून हा भाव प्रति लिटर 36 रुपये करण्यात आला आहे. तसेच दिवाळीनिमित्त प्रति लिटर एक रुपयाप्रमाणे रिबेट देणार असल्याची घोषणा माजी मंत्री थोरात यांनी याच कार्यक्रमात केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 144
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.