Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टपालाच्या पाकिटावर झळकली ‘या’ नेत्याची आणि सहकारातील संस्थेची छबी
सामाजिक

टपालाच्या पाकिटावर झळकली ‘या’ नेत्याची आणि सहकारातील संस्थेची छबी

पोस्टाच्या टपाल पाकिटाचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लोकार्पण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2022Updated:18/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
समृद्ध सहकाराचा वारसा लाभलेल्या संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोस्टाच्या टपाल पाकिटावर सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांची छबी आणि सहकारातील अग्रेसर राजहंस दुधची लोगोसह माहिती झळकली आहे. या टपाल पाकिटाचे लोकार्पण राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय डाक विभागातर्फे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अंतर्गत राजहंस दूध या विशेष टपाल पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे. या विशेष टपाल पाकिटाचे विमोचन डाक अधीक्षक हेमंत खडकीकर आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या पाठोपाठ थोरात यांनी या पाकिटाचे एका कार्यक्रमात लोकार्पण केले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, बाबा ओहोळ, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, तिकीट संग्राहक धीरज अग्रवाल, डाक विभागाचे अमोल गवांदे, अमित देशपांडे, महेश कोबारणे आदी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातून प्रथमत:च अशा टपाल पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे राजहंस दूध संघाची महती केवळ देशातच नव्हे तर जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, ज्ञानेश्वर केदार यांचे यासाठी सहकार्य लाभले.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले,

भारतीय डाक विभागाच्या पाकिटावर जागा मिळणे हा मोठा सन्मान आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्थांचा कारभार सुरू आहे. या सहकारामधील विविध संस्थांनी देशपातळीवर लौकिक मिळवला असून राजहंस दूध संघाने ही आपला मोठा लौकिक निर्माण केला आहे. गुजरात, कर्नाटकसह मराठवाडा विदर्भात या दुधाला मोठी मागणी आहे. राजहंस टपाल पाकिटावर आल्याने संपूर्ण भारतभर राजहंस दुधाचा गौरव होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 92
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा…

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.