Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उपनिरीक्षक जाधव यांच्याकडून तपास काढून घेत चौकशी करा तर वकील गणपूलेंवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा
गुन्हेगारी

उपनिरीक्षक जाधव यांच्याकडून तपास काढून घेत चौकशी करा तर वकील गणपूलेंवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा

पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याकडे अमर कतारींची तक्रार ; दोन शहराध्यक्षांमधील वाद विकोपाला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडून काढून त्यांची चौकशी करण्याची तसेच या गुन्ह्यात आणखी दोघा आरोपींची नांवे समाविष्ठ करण्याची मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कतारी व फिर्यादी जतीन बत्रा यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात शहरातील नामांकित वकील व भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपूले यांच्यावरदेखील कतारी व बत्रा यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याने या गुन्ह्याने वेगळे वळण घेतले आहे. शेखर याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना शहराध्यक्ष कतारी व भाजपचे शहराध्यक्ष गणपूले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने या दोन्ही शहराध्यक्षांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसते. यातच पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात मुख्य सूत्रधार श्रीराम गणपूले असल्याची व त्यांच्याविरोधात फसवणूकीच्या उद्देशाने प्रॉपर्टीचे खोटे व बनावट सर्च रिपोर्ट तयार दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाण्यात फिर्यादी जतीन बत्रा यांच्या तक्रारीवरुन दाखल असलेल्या २५ लाख रुपयांच्या फसवणूकीच्या या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे आहे. जाधव यांनी तक्रारदाराने वारंवार सांगूनदेखील त्याच्या सांगण्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला नाही. उलट या प्रकरणी आर्थिक तडजोड करुन आरोपीला फायदा होण्याच्या दृष्टीने तपासात कसूर करणे व जाणून बुजून गुन्ह्यातून आरोपीची नांवे करुन सोयीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार संबधीतांवर कडक फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांनी आणखी दोन आरोपींची नांवे समाविष्ठ केलेली नाही. फिर्यादीने गुन्हा दाखल करतांना वेळोवेळी तपास अधिकारी व ठाणे अंमलदार यांना विनंती केली, अर्ज दिले व गुन्ह्यात दोघा आरोपींची नांवे वाढविण्याची मागणी केली. व्यवस्थापक कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमीटेड व मुख्य सुत्रधार श्रीराम गणपुले यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली, मात्र गुन्हा दाखल करुन घेतांना जाधव यांनी यातील दोन आरोपींना अभय देत केवळ शाम सोमनाथ माळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. जाधव यांचे वर्तन आरोपींना मदत करणारे असल्याने त्यांच्याकडून या गुन्ह्याचा तपास काढून घेत त्यांची चौकशी सक्षम अधिकाऱ्यामार्फत करण्याची तसेच श्रीराम गणपूले व कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे व्यवस्थापक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 108
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.