Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » … आता शासकीय कार्यक्रमांसाठी नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार!
प्रशासन

… आता शासकीय कार्यक्रमांसाठी नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार!

पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रम घेणाऱ्यांवर होणार कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2022Updated:19/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पालकमंत्र्यांची परवानगी असेल तरच कार्यक्रम घ्या, नाहीतर कार्यक्रम नकोत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर जिल्ह्यातील कोणताही शासकीय अथवा समारंभ असेल त्या कार्यक्रमास, शासकीय निधीतून होणारी कामांची भूमिपुजने, उद्घाटने यांचे आयोजन करण्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे. अशा कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रमांचे आयोजन केल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशा आशयाचे आदेश नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

शासकीय कामांचे श्रेय घेण्याचे प्रकार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जिल्ह्यात सातत्याने सुरु असतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विखे पाटलांकडे वजनदार महसूल खात्याची जबाबदारी आली आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पूर्वीचे सत्ताधारी आता विरोधी बाकावर गेले आहे. संगमनेर, पारनेर, जामखेड आदी काही तालुक्यात सातत्याने तेथील नेत्यांकडून सरकारी निधीतून होणाऱ्या कामासंबधी विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात. या कार्यक्रमांना पालकमंत्र्यांना बोलाविले जात नाही. या पार्श्वभूमीवर हे आदेश काढले गेल्याची चर्चा रंगली आहे.

महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश आणि २०१५ मधील एका शासन निर्णयाच्या आधारे हे आदेशाचे पत्र काढण्यात आले असून पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रमांचे आयोजन केल्यास योग्य ती कारवाई करावी, असे पत्रात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी भोसले यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की,

जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम, समारंभ असेल त्यावेळी पालकमंत्र्यांनाही सदर कार्यक्रमास आमंत्रीत केले जावे, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्र्यांचे नांव योग्य प्रकारे प्रोटोकॉलनूसार छापण्यात यावे. कार्यक्रमावेळी पालकमंत्र्यांना आदराचे स्थान देवून त्यांची व्यासपिठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचाराप्रमाणे करण्यात यावी. जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंत्री यांनाही योग्य ती पूर्व सूचना देवून आमंत्रित करण्यात यावे. त्यांना विश्वासात घेवून ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे याची खातरजमा करुन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नांव योग्य प्रकारे छापण्यात यावे. शासकीय कार्यक्रमांसाठी पालकमंत्री यांचे कार्यालयाकडून पूर्व परवानगी घेण्यात यावी, त्यानंतरच कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रमाचे आयोजन केल्यास योग्य ती कारवाई करावी असे या आदेशात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 118
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.