Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026

गरिबांचे कैवारी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणजे अजिजभाई

28/11/2026

शाश्वत शेतीसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन ही काळाची गरज : आ. सत्यजीत तांबे

28/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आरोग्य सुविधेतून स्वस्थ भारतासाठी केंद्र सरकार कटिबद्ध
आरोग्य

आरोग्य सुविधेतून स्वस्थ भारतासाठी केंद्र सरकार कटिबद्ध

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांचे प्रतिपादन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
देशात उत्‍तम प्रकारच्‍या सर्व आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून स्‍वस्‍थ भारत बनविण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी केले. अहमदनगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाऊंडेशन, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्‍सर सेंटर, न्‍युक्लियर मेडिसिन सेंटर, उद्घाटन समारंभात मंडविया बोलत होते. मंडविया यांच्‍या हस्‍ते राळेगणसिध्‍दी येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्राचा पायाभरणी व पढेगांव येथे नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे लोकार्पण दुरदृष्‍य प्रणालीद्वारे करण्‍यात आले. कार्यक्रमाला राळेगणसिध्‍दी येथुन दुरदृष्‍य प्रणालीद्वारे ज्‍येष्‍ठ समाजसेवक, पद्मभुषण आण्‍णा हजारे, कार्यक्रमस्‍थळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपति डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे विश्‍वस्त वसंत कापरे आदी उपस्थित होते. मंडविया म्‍हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश अनेक क्षेत्रात प्रगती करत असून देशाच्‍या आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकासाशी जोडल्‍याने देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेत अमुलाग्र बदल होत आहेत. स्‍वस्‍थ व सक्षम भारत बनविण्‍यासाठी सरकार प्रयत्‍न करत आहे. चांगली जीवनशैली विकसित करण्‍यासाठी केंद्र सरकारतर्फे देशात 1 लाख 25 हजार वेलनेस सेंटर उभारण्‍यात आले असून येत्‍या काळात 25 हजार वेलनेस सेंटर निर्माण करण्‍यात येणार आहे. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आभार मानले. देशात मेडिकल टुरिझम हब बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करणार असून वैद्यकिय शिक्षणांसाठी विद्यार्थ्‍यांच्‍या जागासुध्‍दा वाढविण्‍यात येतील. ‘आत्‍मनिर्भर भारत’ या संकल्‍पनेत संशोधनाच्‍या माध्‍यमातुन देशातील नवयुवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे. देशांतील गरीब व्‍यक्‍ती व शेतकरी यांच्‍या कल्‍याणासाठी तसेच उद्योग क्षेत्राचा विकास या तीन प्रमुख गोष्‍टींवर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. राळेगणसिध्‍दी येथे नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे दुरदृष्‍य प्रणालीद्वारे उद्घाटनावेळी हजारे यांनी नवीन सर्व सुविधांयुक्‍त प्राथमिक आरोग्‍य केंद्र उपलब्‍ध करून देणार असल्‍याबद्दल डॉ. मंडविया यांचे आभार मानले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्‍हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश सर्व क्षेत्रात प्रगती करत असून आरोग्‍य क्षेत्रातसुध्‍दा मोठे काम होत आहे. अहमदनगर जिल्‍ह्यात नागरीकांना आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहे. उत्‍तर महाराष्‍ट्रात पहिलेच न्‍युक्लियर मेडिसिन सेंटर, पेट स्‍कॅन सेंटर अहमदनगर येथे उभारण्‍यात आले आहे. लवकरच मदर चाईल्‍ड हेल्‍थ हॉस्पिटल उभारण्‍यात येणार असुन आगामी वर्षात जिल्‍ह्यात आरोग्‍य सुविधा संदर्भात 47 कोटी रुपयांचे प्रकल्‍प पूर्ण करण्‍यात येणार आहेत. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 179
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होण्याची शक्यता

27/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

By Annant Ppangarkar28/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका आणि परिसरातील कष्टकरी कामगार वर्ग तसेच त्यांच्या कुटुंबीयांना अद्ययावत…

गरिबांचे कैवारी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणजे अजिजभाई

28/11/2026

शाश्वत शेतीसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन ही काळाची गरज : आ. सत्यजीत तांबे

28/11/2026

आज शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

28/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.