Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य सहकारी साखर संघावर संगमनेरातून ‘यांची’ झाली निवड
शेती व सहकार

राज्य सहकारी साखर संघावर संगमनेरातून ‘यांची’ झाली निवड

सहकारात दिशादर्शक ठरलेल्या थोरात कारखान्याचा याद्वारे झाला गौरव
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2022Updated:22/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सहकारी साखर कारखानदारीत अवघ्या देशासाठी अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने साखर कारखानदारीत वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा साखर कारखाना म्हणून या कारखान्याने राज्यभरात ख्याती मिळविली आहे. या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. याशिवाय या कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनादेखील गोवा येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरविण्यात आले आहे.

राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढ, शेतकरी आणि साखर कारखानदारीच्या समस्या, शेतकऱ्यांना रास्त भाव, ऊस दरासाठी देण्यात येणारा एफआरपी, साखर कारखान्यांना होणारा वित्तीय पुरवठा, साखर कारखानदारीतील व्यावहारिक अडचणी, साखर निर्याती संदर्भातील प्रश्न आदी विविध प्रश्नांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम राज्य साखर संघाच्या माध्यमातून होत असते.

याशिवाय कारखान्यांची गुणवत्ता पूर्ण वाढ, त्यांचा आर्थिक वाणिज्य विषयक कारभार विकासाभिमुख कसा होईल या दृष्टीनेही साखर संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. अशा राज्य साखर संघावर संगमनेर मधून बाबा ओहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ओहोळ यांचे आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे आदींनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 262
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.