Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे सरसकट पंचनामे करा : पालकमंत्री
प्रशासन

अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे सरसकट पंचनामे करा : पालकमंत्री

महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील दोन दिवसात अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांची करणार पाहणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच येत्या दोन दिवसात मंत्री स्वत: नुकसानग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार असून यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महसूल, पशु संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेत अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात झालेले नुकसान, पशुधनावरील लंम्पी आजार, आनंदाचा शिधा किट वाटपाचा आढावा घेतला. बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमनर, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंत्री विखे यांना माहिती दिली.

विखे म्हणाले, सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस ऑक्टोंबरमध्ये झाला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली असली तरी शेवगांव, जामखेड, राहुरी, नेवासा, कोपरगांव या तालुक्यात सर्वाधीक्ष क्षेत्र बाधीत झाले आहे. सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान झाले असून प्रशासनाने सरसकट १०० टक्के पंचनामे करावेत. दीपावली दरम्यान आपण स्वत: काही तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची भेट देवून पाहणी करणार आहोत.

लंम्पी चर्मरोगामुळे पशुधनाचा मृत्यूदर वाढत आहे. त्या संदर्भात सर्व तहसिलदारांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लंम्पी लसीकरण आणि उपलब्ध औषध साठा याचा आढावा घेवून उपाय योजना केल्या जाव्यात, अशा सुचना मंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ या किट वाटपाचाही आढावा घेतला. जिल्ह्यात ४ लाख ९० हजार ६८५ किट प्राप्त आहेत. हे कीट दिवाळीपूर्वी गोरगरीब लाभार्थ्यांपर्यत पोहोचले पाहिजेत, यासाठी सुसूत्रता आणत प्रभावी काम करण्याच्या सुचना मंत्री विखे यांनी दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 135
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.