Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारचा मदतीच्या घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका
राजकारण

सरकारचा मदतीच्या घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका

खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दल म्हणाले, भारत जोडो यात्रा लोकशाही वाचविण्यासाठी!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2022Updated:24/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
दोन वर्षानंतर प्रथमत:च मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असली तरी जास्तीच्या झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्याच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री थोरात बोलत होते. राज्य साखर संघाचे संचालक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. हसमुख जैन, डॉ. जयश्री थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, या वर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जास्तीच्या पावसामुळे पिके वाया गेली. अशा संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची आवश्यकता असते. त्यांना मदत द्यायला हवी मात्र सध्याच्या सरकारकडून वृत्तपत्र, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. काही लोक दौरे करून फक्त प्रसिद्धीसाठी फोटो टाकतात मात्र शेतकऱ्यांना काही मिळत नाही.

पिकविमा कंपन्या नफेखोरी करतात. नफा मिळविण्यासाठी या कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. हा अन्याय टाळण्यासाठी आणि शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी यासाठी आमच्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने “बीड पॅटर्न” तयार केला होता. त्याला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. या पॅटर्नवर काय अंमलबजावणी होते हे भविष्यात कळेलच. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी होते. तरीदेखील त्यांनी दौरे केले. अनेक दौऱ्यात आम्हीदेखील सहभागी झालो होतो. त्यामुळे त्यांनी दौरे केले नाही हे म्हणणे म्हणजे केवळ राजकारण आहे.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या यात्रेबद्दल थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी…

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली भारत जोडो यात्रा ही लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी आहे. या यात्रेला अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून यात्रेला कोणत्याही पक्षांचे बंधन नाही. देशात लोकशाहीचे, बंधूभावाचे व खुले वातावरण राहावे यासाठी लोकशाहीच्या विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्व पक्ष संघटना यामध्ये सहभागी होत असून ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्रातही या भारत जोडो यात्रेचे अभूतपूर्वक स्वागत होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 121
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.