Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी शासन स्तरावर निर्णय घेणार; पालकमंत्री विखे पाटील
राजकारण

बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी शासन स्तरावर निर्णय घेणार; पालकमंत्री विखे पाटील

जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने बाधित क्षेत्राची मंत्री विखे पाटलांनी केली पाहणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2022Updated:24/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांबाबत शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासन स्तरावर निर्णय घेणार असून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पालकमंत्री विखे पाटील यांनी सोमवारी जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. खर्ड्याच्या सिताराम गड मध्ये आयोजित आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत कर्जत-जामखेडचे आमदार माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. विखे पाटील यांनी खर्डा परिसराश मोहरी तेलंगशी जायभाय वाडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पाहणी केली. बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

विखे म्हणाले, ऑनलाइन पीक विमा साठी नोंदणी करताना अडचणी येत असल्याने ऑफलाइन पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांचा खाजगी विमा कंपन्यावर रोष आहे, शेतकऱ्यांकडून पिक विमासाठी काही रक्कम भारत सरकार व राज्य सरकार भागीदारी करून भरत असते, त्या पटीत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. ६५ मिलीमीटर पावसाची अट असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा फायदा मिळत नाही, त्या विषयावर त्या नियमात काय त्रुटी राहिल्या आहेत त्या शिथिल करण्याचा प्रयत्न चालू आहे.

शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी खाजगी विमा कंपनीला ७२ तासाच्या आत कळविण्याची अट शिथिल करण्याची गरज आहे, शेतकऱ्यांची हीच मागणी आहे. यासाठी कृषीमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. सरकार शेतकऱ्यांचे आहे, पैसा शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांना जाचक अटी घालून चालणार नाही. त्यासाठी विमा कंपन्यांना शेतकरी हिताच्या अटी घालून शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनातर्फे गोरगरिबांना देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आला. उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. केशव तुंबारे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ. कुलदीप चौरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार राम शिंदे म्हणाले,

अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जाव्यात. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 121
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.