Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल मंत्री विखे पाटलांना संगमनेर शिवसेनेने लिहिलेली “ती” पोस्ट चर्चेत
राजकारण

महसूल मंत्री विखे पाटलांना संगमनेर शिवसेनेने लिहिलेली “ती” पोस्ट चर्चेत

शिवसेनेने समाज माध्यमाद्वारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंवर साधला निशाणा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2022Updated:25/10/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याचा पदभार हाती घेतल्यानंतर वाळू संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे हे निर्णय राज्यासाठी नसून केवळ संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यासाठीच असल्याची टीका मंत्री विखे यांच्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शिवसेनेची समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा करत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. ठाकरे यांच्या या भेटीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती. या टीकेमुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी विखे पाटील यांच्यासाठी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टद्वारे महसूल मंत्री विखे पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला असून शिवसेनेमुळे त्यांना पहिले मंत्रीपद मिळाले होते, त्यामुळे मनाचा मोठेपणा दाखवत विखेंनी ठाकरे यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. मात्र विखे यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे ज्या पक्षाने मोठे केले त्या पक्षावर कुरघोडी करण्याची विखेंची सवय असल्याचे सांगत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल केली आहे.

काय म्हटले आहे या पोस्टमध्ये
महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांसाठी ही पोस्ट आम्ही देत आहोत…

आदरणीय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर संभाजी नगर दुष्काळ पाहणी दौरा निमित्त टीका टिपणी केली. खरंतर दिवाळीचा काळ आहे, आपणही मनाचा मोठेपणा दाखवून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे होत्या. कारण आपल्या घरात पहिलं मंत्रिपद ठाकरे परिवाराने आपल्याला बहाल केलं होत. परंतु आपल्याला सवयच आहे, ज्या पक्षाने मोठे केलं त्या पक्षातच कुरघोड्या करायची. तसेही आपण सर्व पक्ष फिरून आलेले. आता बीजेपीचे निष्ठावंत कार्यकर्ते झालेले आहात. आपण जर उद्धव साहेबांवर टीका करून अजून मोठे होणार असाल किंवा तुमच्या चिरंजीवाला केंद्रात मंत्रीपद मिळणार असाल तर खुशाल टीका करा. तसंही सध्या फॅड निघालेल आहे. शिवसेनेवर टीका करा, उद्धव साहेबांवर टीका करा आणि मंत्रीपद मिळवा. परंतु सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे, सध्या तुमच्याकडे महसूल मंत्री पद आहे. याचा सदुपयोग आपण आपल्या जिल्ह्यासाठी व जनतेसाठी करावा. परंतु आपण हे सगळं सोडून ज्या ठिकाणी भविष्यात आपल्याला त्रास होईल त्यांना त्रास देण्याचा व खुन्नस काढण्याचे काम करत आहात. आपण फक्त आणि फक्त काय करत आहात! तर संगमनेर व पारनेर तालुक्यातील जनतेला वेठीस धरत आहात. महसूलचे धोरणात्मक निर्णय घेणे सोडून फक्त वाळू वाहतूक करणाऱ्या गाढवांवर कारवाई, रिक्षावर, पिकअपवर कारवाई करा. वाळू बंद करा. मुरूम बंद करा. खाणी बंद करा. ट्रॅक्टर बंद करा. एवढंच काम आपण करून धन्यता मानत आहात. परंतु आपल्या या सर्व गोष्टीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसलेला आहे. १५०० रुपयेचा मुरूम २५०० रुपयाला घ्यायची वेळ आली. २५०० रुपयांचा वाळू ट्रॅक्टर पाच हजार रुपयाला घ्यायची वेळ आली. २२०० रुपये ब्रासची खडी ३५०० रुपये ब्रास घेण्याची वेळ आणली. आपल्याकडे एवढं मोठं महसूल खात आहे. कृपया आपण त्याचा सदुपयोग जनतेसाठी करावा व धोरणात्मक निर्णय घ्यावे. संगमनेर व पारनेर तालुक्यात खुन्नस काढत बसू नये, ही आपणास विनंती. दिवाळीनिमित्त, पाडव्यानिमित्त आपणास भरपूर शुभेच्छा आपणावर टिपणी करण्या एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही. परंतु उद्धव साहेबांना बोलल्यावर आम्हालाही मनाला वाईट वाटते.

शिवसेना संगमनेर शहर व तालुका

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 116
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.