Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आज पासून पुन्हा आठवडाभर बालकांवर होणार मोफत हृदय उपचार
आरोग्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आज पासून पुन्हा आठवडाभर बालकांवर होणार मोफत हृदय उपचार

नुकतेच झाले होते ८२ बालकांवर हृदय उपचार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
बालकांच्या हृदयरोगाबाबत झालेली जनजागृती आणि सर्वसामान्य रुग्णांच्या मागणीमुळे या महिन्यात पुन्हा एकदा एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये बालकांच्या हृदय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यात तब्बल आठवडाभर बालकांवर मोफत हृदयउपचार करण्यात येणार आहेत.गेल्या दोन महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या बालकांवरील मोफत हृदयउपचार आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल ८२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार करण्यात आले. ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचा या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. आज २६ ऑक्टोंबरपासून या शिबिरास सुरुवात होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवरील उपचार होत आहेत. गंभीर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया यासाठी नागरिकांना पूर्णपणे निशुल्क, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या दोन्ही योजना उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ आतापर्यंत हजारो रुग्णांना झाला आहे. गंभीर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया यासाठी मोठा खर्च येतो. तो सर्वसामान्य, आर्थिकरित्या दुर्बल रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण उपचार घेणे, शस्त्रक्रिया करुन घेणे टाळतात. वेळेत आणि योग्य उपचार न झाल्याने अनेकांचे जीवही जातात. कुठल्याही रुग्णाची उपचारांअभावी परवड होऊ नये, यासाठी सरकारने जीवनदायी योजना आणल्या आहेत. या योजनांचा रुग्णांना लाभ मिळावा त्याकरिता परिपूर्ण वैद्यकीय सेवा, सुविधा असलेली राज्यातील ठराविक रुग्णालये या दोन्ही योजनेशी संलग्न आहेत. योजना सुरू झाल्यापासूनच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटल या दोन्ही योजनांशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे या महिन्यात बुधवार (दि २६) ते सोमवार (दि ३१) दरम्यान बालकांवर मोफत हृदय उपचार करण्यात येणार आहेत. आपल्या बालकांना जर हृदयाशी संबंधित काही लक्षणे असतील तर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हृदय उपचारांचा विक्रम
गेल्या दोन महिन्यात अवघ्या चार दिवसांत ८२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार करण्यात आले. येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण उत्तर महाराष्ट्रातील होते. यामध्ये शिरपूर, नंदुरबार, धुळे, भुसावळ, मालेगाव, सटाणा, नाशिक येथील तर ठाणे आणि पालघरमधील भिवंडी, पालघर व शहापूर येथील रुग्णांचा समावेश होता.

स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांबरोबरच सध्या सफेद शिधापित्रका धारकांना देखील मिळतो आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या दोन्हीयोजनांच्या संदर्भाने रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अशा स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येथील प्रशिक्षित कर्मचारी योजनेत सामाविष्ट असलेल्या आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया या संदर्भाने योग्य मार्गदर्शन करतात. १३ जणांची टीम येथे कार्यरत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 142
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.