Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरेंची साडेसाती संपेना; केंद्रीय निवडणूक आयोगाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र ठरविले अवैध
राजकारण

ठाकरेंची साडेसाती संपेना; केंद्रीय निवडणूक आयोगाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र ठरविले अवैध

विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र नसल्याचे कारण केले पुढे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेनेत उद्भवलेला पेच अद्यापही कायम आहे. आपल्या गटाला समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अवैध ठरविले आहे. तर उर्वरित प्रतिज्ञापत्र वैध असल्याचा निर्वळा आयोगाने दिला आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर तात्पुरत्या स्वरूपात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा नवीन निर्णय समोर आला आहे. दरम्यान शिवसेना नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे दावा केल्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता.त्यामुळे आपल्याच गटाला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे दावा करणारे प्रतिज्ञापत्रे ठाकरे-शिंदे गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दाखल केलेल्या अकरा लाख प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात नसल्याचे कारण पुढे करत आयोगाने अवैध ठरविले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून त्यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे सांगितले जाते.दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अडचणीत आणण्यासाठी राजकीय दबावाचा कितीही वापर झाला तरी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना असून येत्या काळात हे सर्व राज्यासमोर येणार आहे असा विश्वास शिवसेनेचे संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 236
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.