Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी भिलारमध्ये
पत्रकारिता

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी भिलारमध्ये

मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे, खा. श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ. सुरेश भोसले, चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार (महाबळेश्वर) येथे शनिवारी (२९ ऑक्टोबर) होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र महागौरव” पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

पत्रकारितेमध्ये दिवसेंदिवस मोठा बदल होत असून सध्या डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले आहे. मेट्रोसिटीपासून खेडेगावापर्यंत सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यातील डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र करून ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली. सध्या डिजिटल मीडियामधील सर्व देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उल्लेख होतो वेब पोर्टल, युटयुब चैनल व इतर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य न्याय मिळावा व शासनाने याची दखल घ्यावी, यासाठी ही संघटना अहोरात्र झटत असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार येथे होणार असून राज्यभरातून संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात ‘डिजिटल मीडिया नवे माध्यम’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून या परिसंवादामध्ये जलतज्ञ अनिल पाटील, ॲड. अतुल पाटील, प्राध्यापक विशाल गरड, माहिती जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये कराड येथील डॉ. सुरेश भोसले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, निर्माता दिग्दर्शक मंगेश देसाई, श्रीमती चेतना सिन्हा, दिग्दर्शक बापूराव कऱ्हाडे, उस्मानाबाद येथील डॉ. प्रतापसिंह पाटील, सिंधुदुर्गचे अच्युत सावंत, सोलापूरचे श्रीकांत मोरे, नागपूर येथील डॉ. संजय उगेमुगे यांचा सन्मान होणार आहे. यासह विशेष सन्मान म्हणून पत्रकार दीपक भातुसे, युवा उद्योजक गणेश राऊत, पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर, कोल्हापूर येथील यशवंत पाटील, सातारा जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सामाजिक कार्यकर्ते सरदार पांडुरंग बंगे, सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे, सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, प्राथमिक शिक्षक हणमंत काटकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, उद्योजक लालासाहेब शिंदे, नरसिंग दिसले, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उद्योजक मनीषा मुळीक यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 133
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.