Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आयुक्त तुकाराम मुंढेनी सुनावले… खासगी प्रॅक्टिस कराल तर धरावा लागेल घरचा रस्ता
आरोग्य

आयुक्त तुकाराम मुंढेनी सुनावले… खासगी प्रॅक्टिस कराल तर धरावा लागेल घरचा रस्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियानचा पदभार स्वीकारताच बीडपासून केली झाडाझडतीला सुरुवात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आता सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर त्यांना थेट सेवेतून डिसमिस केले जाणार आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी हा शेवटचा इशारा असेल, रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा आणि हेळसांड सहन केली जाणार नाही असे सांगत डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.धडाकेबाज निर्णय आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी डॅशिंग अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेताच पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णयांना सुरुवात केली आहे. याची प्रचिती त्यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यात आली आहे. आरोग्य विभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर मुंढे मराठवाड्यातील बीडच्या जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्वांचीच कान उघडणी केली. राज्यभरातील अनेक आरोग्य अधिकारी सरकारी रुग्णालयात कमी आणि आपल्या खाजगी ओपीडीमध्ये जास्त, असे चित्र सर्रासपणे आढळून येत होते. मुंढे यांच्या अचानक दिलेल्या भेटीतही हाच अनुभव आला. अनेकदा यावर ओरड होऊनदेखील फारसा फरक पडत नव्हता. त्यामुळे आरोग्य संचालनालयाचा पदभार नव्याने हाती घेतलेल्या मुंडे यांच्या या शेवटच्या वार्निंगने राज्यातील आरोग्य अधिकारी आता चांगलेच धास्तावले आहेत. तुकाराम मुंढे यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली असून अचानकपणे रुग्णालयांना भेटी देत गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, प्रसूती वॉर्ड आणि फीव्हर क्लिनिकला त्यांनी भेट दिली. यावेळी तेथील डॉक्टर उपस्थित नव्हते. तेथे खासगी डायग्नोसिस सेंटरद्वारे आलेल्या रिपोर्टच्या आधारे रुग्णांवर उपचार सुरू होते. तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचे बेबी कार्ड तयार करण्यात आलेले नव्हते. यावरून त्यांनी तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले. मुंढे यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश लातूरच्या आरोग्य उपसंचालकांना दिले असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीदरम्यान मुंढे यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत तालुका आरोग्य अधिकारी यांनी खासगी प्रॅक्टिस करू नये, असे आढळल्यास सेवेतून डिसमिस करण्याचा इशारा दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 227
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.