Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तब्बल ३ लाखाचा नफा तोही अवघ्या ५ महिन्यात
शेती व सहकार

तब्बल ३ लाखाचा नफा तोही अवघ्या ५ महिन्यात

शेवंतीच्या अडीच हजार रोपांची लागवड करत पारनेरच्या साठेंनी शोधली वेगळी वाट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2022Updated:31/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विद्याचंद्र सातपुते

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अनेक शेतकरी पिढीजात फुलशेती करत असले तरी सध्या वाढती मागणी आणि बदलते तंत्रज्ञानामुळे पारंपरिक फुलांसह नानाविध फुले शेतात बहरु लागली आहेत. पारनेर तालुक्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी अशाच शेवंती फुलांची लागवड करुन फुलशेतीत वेगळी वाट शोधली आहे. शेवंती फुलशेतीतून साठे यांना अवघ्या पाच महिन्यात खर्च वजा जाता तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेती हंगामी व पावसावर अवलंबून असून, बहुतेक क्षेत्र कोरडवाहू आहे. तालुक्यातील हंगा हे गाव भौगोलिक दृष्ट्या आकाराने व क्षेत्रफळाने मोठे आहे. याच गावात पारंपरिक शेती करताना नितीन साठे या तरुण शेतकऱ्याने शेतीतील वेगळी वाट शोधत फुलशेतीकडे आपला मोर्चा वळवला.

या कामी त्यांना आई हिराबाई, बंधू सचिन यांची साथ लाभली. चालू हंगामात त्यांनी शेवंती या फुल शेतीचे नियोजन केले होते. सेंट व्हाईट या वाणाची निवड त्यांनी या हंगामात केली. या जातीचे फुले आकाराने मोठी व मध्यभागी आकर्षक पिवळ्या रंगाचा ठिपका असल्याने या फुलांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ५ जून रोजी सुमारे अडीच हजार रोपे त्यांनी ठिबक सिंचन करून लागवड केली.

सुमारे १७ गुंठे क्षेत्रावर फुलांची लागवड करण्यात आली होती. डोंगर उताराला असलेल्या शेतीवर ही लागवड करण्यात आली. उत्तम निचऱ्याची व मध्यम प्रतीची जमीन या पिकासाठी मानवते हा त्यांचा अनुभव होता. सुरुवातीला ठिबक संपूर्ण शेतात पसरून देण्यात आली. दोन ओळीतील अंतर सहा फूट तर दोन रोपांतील अंतर सव्वा फूट ठेवले होते. स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी हे अंतर योग्य असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

ड्रीपद्वारे विद्राव्य खतांचे नियोजन त्यांनी शेवंती पिकासाठी केले होते. योग्य वेळी केलेली लागवड व वेळोवेळी केलेली मशागत यामुळे पिकाची वाढ समतोल पद्धतीने झाली. चालू हंगामात दसरा या महत्त्वपूर्ण सणासाठी सुमारे पाच क्विंटल फुले बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आले. दसरा सणाला सरासरी २५० रुपये प्रति किलो भाव या फुलांना मिळाला.

दिवाळी सणासाठी राखून ठेवलेली फुले सुमारे १५ क्विंटल विक्रीसाठी बाजारात पाठवण्यात आली. या फुलांना सरासरी १०० रुपये प्रति किलो बाजार भाव मिळाला आहे. आतापर्यंत २ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न झाले.

सुमारे ५ क्विंटल फुले अजून बाजारात पाठवणे बाकी आहे. एकूण खर्च वजा जाता तीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न होणार आहे. शेतीचे नीटपणे केलेले नियोजन आणि साधलेली वेळ यामुळे फुल शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवता येते हे नितीन साठे या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

” शेतकऱ्यांनी नियोजन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास हवामान बदलाच्या या संकटातून वाचता येईल”.

– नितीन साठे, फुल उत्पादक शेतकरी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 122
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.