Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आमदार रवी राणांची दिलगिरी तर आमदार बच्चू कडू कार्यकर्त्यांशी बोलून घेणार निर्णय
राजकारण

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आमदार रवी राणांची दिलगिरी तर आमदार बच्चू कडू कार्यकर्त्यांशी बोलून घेणार निर्णय

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. या मध्यस्थीनंतर आमदार राणा यांनी आपला आरोप मागे घेतला तर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामुळे बच्चू कडू यांची वेगळीच भूमिका समोर आली असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या घटक पक्षांमधील दोघा आमदारांमधील वाद ५० खोक्यांच्या आरोपावरून विकोपाला गेला होता. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत पोहोचणाऱ्या या वादात ऐनवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उडी घेत मध्यस्थी केली. राणा आणि कडू या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलाविले होते.

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या तीन-साडेतीन तासांच्या चर्चेनंतर आमदार राणा यांनी आम्ही दोघेही सरकार सोबत असल्याचे सांगितले. राणा यांनी बोलता बोलता तोंडातून निघालेले शब्द मागे घेत असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. विचारातील मतभेदांमुळे तोंडातून असे शब्द निघाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार बच्चू कडू यांच्याही तोंडातून काही अपशब्द निघाले होते त्यामुळे हा वाद वाढत गेला.

राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी बच्चू कडू यांचा वेगळाच सूर दिसत आहे. त्यांनी वादावर स्पष्टपणे न बोलता आज कार्यकर्त्यांशी चर्चा आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून भूमिका जाहीर करू. यामुळे बच्चू कडू आता काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळं. मी त्यांचे आभार मानतो. पण आपल्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासोबत आज संध्याकाळी ६ वाजता बैठक घेणार आहे. नंतर पुढील निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

‘वाद रवी राणांमुळे सुरू झाला, माझ्यामुळे नाही’ वाद व्हायला नको होता. आरोपांना सुरुवात रवी राणांनीच केली. त्यामुळे वादाला तोंड फुटलं. मी वाद केलाच नाही. पण आरोप झाल्यानंतर गप्प राहिलो असतो तर लोकांनी मला बदनाम केलं असतं. त्यामुळे आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानं वाईट किंवा चुकीचं केलं असं मला वाटत नाही.

जे काही असेल या वादात आम्ही आयुष्य घालवणार नाही. व्यक्तीगत आरोपांमध्ये शक्ती वाया घालवण्यापेक्षा सार्वजनिक कामासाठी शक्ती लावण्याचा प्रयत्न करू, असं कडू म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 133
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.