Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पायातले हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही; माजी खासदार राजू शेट्टी
राजकारण

पायातले हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही; माजी खासदार राजू शेट्टी

७ नोव्हेंबरला साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा तर १७,१८ नोव्हेंबरला ऊसतोड काम बंद राहणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2022Updated:02/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे. शेतकरी आणि कारखाना प्रश्नांवर अनेकदा न्यायालयात धाव घेतली मात्र आता न्यायव्यवस्था, सरकारवर विश्वास राहिलेला नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पायातले हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले.

शेट्टी यांच्या उपस्थितीत मांडवे खुर्द येथे झालेल्या ऊस परिषद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, उद्योजक किरण वाबळे, प्रगतशील शेतकरी कारभारी आहेर, जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शेतकरी नेते जगदीश गागरे, अशोक खेमनर, प्रा. जालिंदर पाटील, सीताराम देठे, बाळशिराम पायमोडे, भूमीपुत्र संघटनेचे प्रवक्ते राजु रोकडे, जिल्हाध्यक्ष अमोल उगले, सरपंच सोमनाथ आहेर, भाऊसाहेब टेकुडे, शरद पवळे, विशाल करजुले, स्वप्निल झावरे, अमोल रोकडे, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, सुदामराव शिर्के यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, सध्या महाराष्ट्रात १०१ सहकारी साखर कारखाने असून ९९ खाजगी कारखाने चालू आहेत. परंतु सहकारी साखर कारखाने राजकारण्यांच्या हातात आहेत. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल देशाची संकल्पना राबवत असताना साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन होत नाहीत. त्यामुळे या चोरीला सरकारचा आर्शिवाद आहे. सरकार साखर सम्राटांचे आहे.

जन आंदोलन व सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. काटा मारणार्‍यांचा काटा स्वाभिमानी शेतकरी संघटना काढणार असून ७ नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेणार आहे. यावर कार्यवाही न झाल्यास १७ व १८ नोव्हेंबर ऊस तोड काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

एफआरपीसाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी भांडले पाहिजे. अन्याय सहन न करता विरोध करुन पेटून उठा. मेलेल्या लोकांचे लचके ज्याप्रमाणे गिधाडे तोडत आहे त्याप्रमाणे, साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे कमी भाव देऊन अन्याय करत आहे. साखर कारखानदार दिवसाढवळ्या शेतकर्‍यांची लूट करत असून साखरेचे उत्पन्न जास्त मिळत असतानाही कमी भाव देत आहेत. कारखानदारी अडचणीत आहे म्हणून कुणी आत्महत्या केली, असे उदाहरण घडले नाही. त्यामुळे या लुटीच्या विरोधात बोलले नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही.

यावेळी संतोष वाडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालिंदर पाटील यांचे भाषणे झाली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 113
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.