Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ३ वर्षाचा चिमूरडा गंभीर जखमी ; अहमदनगरला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
अपघात

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ३ वर्षाचा चिमूरडा गंभीर जखमी ; अहमदनगरला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

थोरात कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांवर ओढावला दुदैवी प्रसंग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील घटना

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

आईवडीलांच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याला त्यांच्या कुशीतून ओढत त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. चिमुरड्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्यामुळे जाग्या झालेल्या आईवडीलांनी बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली असली तरी या घटनेत चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्याला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली.

विरु अजय पवार असे या चिमुरड्याचे नांव आहे. सध्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु आहे. यासाठी संगमनेर तालुक्यात काही ऊसतोडणी कामगार आले आहेत. थोरात कारखान्याच्या ऊसतोडणीशी संबधीत असलेले २० मजुरांचे जळगांव येथील कुटूंब आश्वी खुर्द येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ कोप्या टाकून राहत आहे. गुरुवारी रात्री हे ऊस तोडणी कामगार आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असतांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तेथे आलेल्या बिबट्याने आई वडीलांच्या कुशीत झोपलेल्या या चिमूरड्याला अलगदपणे आपल्या जबड्यात उचलले. मात्र अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चिमुरडा जीवाच्या आकांताने ओरडू लागल्या जाग्या झालेल्या आई वडीलांनी समोरचे दृष्य बघताच त्यांची भितीने गाळण उडाली. अशाही अवस्थेत त्यांनी या चिमुरड्याला आपल्या जबड्यात घेवून जात असलेल्या बिबट्याचा पाठलाग केला. आरडाओरडीमुळे जागे झालेल्या अन्य मजुरांनीही चिमुरड्याला घेऊन १००-१५० फुटावर गेलेल्या बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. बराच प्रतिकार केल्यानंतर बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याला सोडविण्यात हे मजुर यशस्वी झाले. तोपर्यत चिमुरडा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर झाला होता. त्याच्या मानेवर खोलवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्यातुन मोठा रक्तस्त्राव सुरु होता.

जखमी अवस्थेतच या चिमुरड्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावत असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगीतल्याने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असून अद्यापही या चिमुरड्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.

संगमनेर-अकोले तालुक्यात बिबट्यांचा रहीवास मोठ्या संख्येने आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. विशेषत: लहान बालकांनादेखील बिबट्याने आत्तापर्यत लक्ष्य केल्याने वनविभागाचे स्थानिक अधिकारी मात्र यासंदर्भात फारसे गंभीर दिसत नाही.

घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी व माजी जिल्हा परिषद सदस्य गणपत सांगळे, थोरात कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून माहिती घेतली माहिती मिळते. दरम्यान या संदर्भात अधिक माहितीसाठी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 155
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.