Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टोल प्रशासनाला जाग येईना; राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांसह उपोषण सुरु, प्रशासनाला आणखी किती मृत्यू हवेत!
आंदोलन

टोल प्रशासनाला जाग येईना; राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांसह उपोषण सुरु, प्रशासनाला आणखी किती मृत्यू हवेत!

टोल प्रशासनाला फक्त टोल हवा, सुविधांच्या नांवाने बोंबच त्यामुळे आता लढाई आरपारची : कपिल पवार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर नजीकच्या हिवरगांव पावसा येथील टोल प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामूळे आत्तापर्यत अनेक अपघात झाले. यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांचा मृत्यू झाला तरी टोल प्रशासन आपल्या कारभारात सुधारणा करावयास तयार नाही. टोल वसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोल प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली आरपारच्या लढाईच्या इशारा देत शुक्रवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.टोल प्रशासनाच्या विरोधात आत्तापर्यत सर्वच पक्षांनी आंदोलने केली, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याशिवाय ठोस अशी कोणतीही कृती टोल प्रशासनाने केलेली नाही. स्थानिक नागरिकांनादेखील टोल वसुलीचा फटका बसत असतांना या टोल प्रशासनावर कारवाई करण्याऐवजी त्यांना कोणते झारीतील शुक्राचार्य पाठीशी घालत आहेत याचादेखील उलगडा होतांना दिसत नाही. टोल प्रशासनाला नेमके कोणाचे आशिर्वाद आहेत, त्यामुळे त्यांच्या कारभारात सुधारणा होत नाही.वारंवार सुचना देवून, आंदोलनाचे इशारे देवूनदेखील महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे बुजविले जात नाही. सर्व्हीस रोडची कामे केली जात नाहीत. दिशादर्शक गावांचे फलक लावले जात नाहीत. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीला आळा घातला जात नाही. आदी कारणामुळे या टोल नाक्यावर वारंवार वाद होतांना दिसतात. अनेक कामे पुर्ण झालेली नसतांना, अनेक कामे अपूर्ण कामांकडे लक्ष दिले जात नसतांनादेखील येथे टोल वसुली जोरात सुरु आहे.या मार्गावर झालेल्या अपघातास, त्यात झालेल्या अनेकांच्या मृत्यूस, त्यांना गंभीर इजा पोहोचविण्यात, कायमचे अपंगत्व आणण्यात, वाहनांच्या नुकसानीस टोल प्रशासनच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल करण्यास प्रशासन तयार नाही. अपघातात मृत्यू आल्याने अनेक घरातील कर्ते गमवावे लागले असल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीस जबाबदार असलेल्या टोल प्रशासन, पेट्रोलिंग व्यवस्थापन आणि संबधितांवर सदोष मणुष्यवधाचे गुन्हे दाखल करुन रस्त्याची कामे तातडीने पुर्ण करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी जिल्हा युवक कॉग्रेसने ही सर्व कामे पुर्णत्वास जाईपर्यत उपोषण करण्याचा निर्णय घेत उपोषणास सुरुवात केली आहे.कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली टोल नाक्यावर शुक्रवारी उपोषणाला सुरवात झाली आहे. पवार यांच्यासह अक्षय भालेराव, राहुल वर्पे, मनिष माळवे, किरण घोटेकर, नितीन अहिरे, अशोक काळे, प्रसाद काटे, गजानन भोसले, विकी पवार आदी पदाधिकारी, नागरिकांसह अनेकांनी यात सहभाग घेतला आहे. 

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 109
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.