Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पोलिसांच्या कारवाईत 172 किलो गांजा पकडला
गुन्हेगारी

संगमनेर पोलिसांच्या कारवाईत 172 किलो गांजा पकडला

गांजाची वाहतूक करणारे दोघे पकडले, ब्रिझा कार ताब्यात ; गांजा प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2022Updated:06/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

गांजाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरमध्ये 172 किलो गांजा सह तब्बल 24 लाखाच्या माध्यमातून हस्तगत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या गांजा प्रकरणी सखोल तपास करून याची पाळमुळे शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

पोलीस पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातात की संबंधितांना क्लीन चिट देतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. संगमनेर शहरानजीक कोल्हार-घोटी राज्यमार्गावर समनापुर शिवारात शहर पोलिसांनी ही कारवाई केली. एका ब्रिझा कारमधून कोल्हार घोटी मार्गावरील लोणी कडून संगमनेरच्या दिशेने गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी समनापुर जवळील नसीब वडापाव सेंटर जवळ थांबले होते. संशयास्पद ब्रिझा कार (एम.एच. 50 एल 9970) तेथे आली असता पोलिसांनी कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीस पथकाने कारची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना 15 लाख 55 हजार 740 रुपये किमतीचा उग्र वास असलेला 172 किलो 80 ग्राम गांजा आढळून आला. त्यामुळे संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस बळापुढे त्यांचे प्रयत्न फोल ठरले. पोलिसांनी कारमधील दोघा संशयीतांसह त्यांच्याकडील मोबाईल आणि कार असा सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणला. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आरोपी संदीप लक्ष्मण भोसले (वय 35 वर्षे, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) आणि बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (वय 30 वर्ष रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघा आरोपीं विरोधात पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.

“पोलीस उपाधीक्षकांची पत्रकार परिषद आणि माहिती लिक”

अनेक महत्त्वपूर्ण कारवायांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी पत्रकार परिषदा घेऊन माध्यमांना माहिती देत असतात. एकाच वेळी सर्व माध्यमांना जबाबदार अधिकाऱ्याकडून पत्रकार परिषदेत माहिती देण्याचा प्रकार आहे. मात्र संगमनेरात अशा मोठ्या कारवाया नंतर काही माध्यमांना आधीच माहिती पुरविली जाते आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत पुन्हा ही माहिती उर्वरित पत्रकारांना दिली जाते. पत्रकार परिषदेत आधीच या कारवायांच्या बातम्या समाज माध्यमातून फिरत असतात त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदा केवळ फार्स ठरत असल्याचे दिसते. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 108
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.