Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नासिक पुणे मार्गावरील दुरवस्थेबद्दल संतप्त झालेले खासदार कोल्हे म्हणाले; या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावणार
आंदोलन

नासिक पुणे मार्गावरील दुरवस्थेबद्दल संतप्त झालेले खासदार कोल्हे म्हणाले; या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावणार

कामे पूर्ण करण्यासाठी दिली दहा दिवसाची डेटलाईन; संगमनेर राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंतर महामार्गाच्या कामासाठी आता थेट खासदार अमोल कोल्हे यांचा पुढाकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि टोल प्रशासना विरोधात संगमनेर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या उपोषणाला आठवडा उलटत नाही तोच महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आता खासदार अमोल कोल्हे संतप्त झाले असून त्यांनी थेट या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्याचा इशारा दिला आहे.

नासिक-पुणे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे तसेच या मार्गावरील टोल नाके देखील सुरू झाले असून वाहन चालकांकडून टोल असलेली सुरू झाली आहे. मात्र या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे. यातून अपघाताच्या देखील अनेक घटना घडल्या. अनेक जण जायबंदी झाले तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले. महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून येत्या दहा दिवसात जर या रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही तर खड्ड्यामध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावले जातील, असा संतप्त इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे कोणाच्याही तक्रारीची दखल न घेणारे महामार्ग प्राधिकरण आता खासदार कोल्हे यांच्या तक्रारीची दखल घेते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

पुणे नाशिक महामार्गावरील पुणे जिल्हा दरम्यान असलेल्या राजगुरुनगर ते आळेफाटा दरम्यान पर्यायी रस्त्याची कामे आणि सुरक्षा विषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची नुकतीच बैठक घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड, दिलीप शिंदे यांच्यासह सर्व कंत्राटदार उपस्थित होते.

कोल्हे यांनी महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यामुळे धोकादायक बनलेला वाहतुकीचा मुद्दा प्राधिकरण आणि कंत्राटदारांच्या निदर्शनास आणून दिला. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असल्याने त्यांनी नागरिकांच्या तक्रारीची वाट न बघता स्वतःहून जबाबदारीने पुढील दहा दिवसात दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत अन्यथा या खड्ड्यामध्ये कंत्राटदार अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबर टाकून फलक लावण्यात येतील असा इशारा दिला.

कोल्हे यांनी संबंधितांना सुनावत म्हटले आहे की, देखभाल दुरुस्तीसह जर तुम्ही पैसे घेतात तर मग दुरुस्तीची कामे जबाबदारीने करायला हवी. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी नियमितपणे या रस्त्याने ये-जा करत असतात. त्यांना या रस्त्याचे दुरवस्था दिसत नाही का? असा सवाल केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्याही महामार्गावर खड्डे दाखवा, अशी मोहीम हाती घेतली होती. महामार्गावर खड्डे दाखविल्यास तातडीने बुजविण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 127
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.