Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले सत्य!
राजकारण

जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले सत्य!

नातेवाईक, बगलबच्चे, हितसंबधी यांना ठेके देवून विकास कामांचे वाटोळे केले आहे. गुणवत्तेचे कोणतेही मापदंड न लावता कामे केली जातात. नगरपालिका अधिकारी त्याकडे दबावाखाली दुर्लक्ष करतात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत असतांना करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचा वर्षाच्या आतच बोजवारा उडाला आहे. रस्ते बनवितांना पुरेसे डांबर न वापरल्याने खडी उघडी पडली, क्रॉक्रीटीकरण करतांना निकृष्ठ व पुरेसे सिमेंट वापरले नाही. जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले. येत्या निवडणूकीत रस्त्याचा विषय कळीचा मुद्दा बनविण्यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

रस्ते निरीक्षण पाहणी अभियानात भाजपाचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, माजी उपनगराध्यक्ष व शहर संगठन सरचिटणीस जावेद जहागीरदार, उपाध्यक्ष सुनील खरे, भाऊ जाखडी, भगवान कुक्कर, शाकीर मस्तान आदींचा सहभाग होता.भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी केली रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी

रविवारी (ता. १३) शहराच्या विविध भागात विशेषत: दिल्लीनाका, कुरणरोड, कोल्हेवाडी रस्त्यालगत मोना प्लॉट, वीर सावरकर मार्ग, स्वामी समर्थ हॉटेल रस्ता, नवीन नगर रस्ता, राजपाल क्लॉथ जवळचा ओंकारनाथ मालपाणी मार्ग, परिवार किराणा ते अकोले बायपास, अकोले बायपासवरील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटल ते गुंजाळवाडी रस्ता, मिरवणूक मार्गावरील सय्यदबाबा चौक आदी ठिकाणच्या रस्त्यांची पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. वर्षभरापूर्वी केलेल्या या रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना खड्ड्यातुन ये-जा करावी लागते.

पालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपत असतांना शेवटी घाईघाईट मंजुर केलेल्या या विकास कामांची अवस्था दयनीय झाली असून गेली तीस वर्षे नगरपालिकेत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली कॉग्रेसची सत्ता आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेत आपले नातेवाईक, बगलबच्चे, हितसंबधी यांना ठेके देवून विकास कामांचे वाटोळे केले आहे. गुणवत्तेचे कोणतेही मापदंड न लावता कामे केली जातात. नगरपालिका अधिकारी त्याकडे दबावाखाली दुर्लक्ष करतात, परिणामी नव्याने करण्यात आलेले रस्ते खड्डेमय बनले आहे.

गवंडीपुरा मज्जीद-नेहरु चौक-नगरपालिका कार्यालय हा रस्ता गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र या संपुर्ण मार्गांवर पाणी निचरा होण्यासाठी कोठेही एकसुध्दा चेंबर टाकलेला नाही. दीड कोटी रुपये खर्च करुन रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आले मात्र, पाणी निचऱ्यासाठी एकही चेंबर नसल्याने हा रस्ता अनेक ठिकाणी खराब होत आहे. अद्याप या कामासाठी वर्षाचा कालावधीदेखील उलटला नसतांना रस्त्याची ही दुरवस्था समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या कराच्या पैशाचा मोठा अपव्यय झाला आहे. पुढील वर्षी पुन्हा दोन कोटी रुपये खर्च करुन नवा रस्ता बनविला जाईल. पालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मध्यंतरी नगरपरिषद निवडणूकीचे बिगूल वाजल्याने पालिकेची ‘इज्जत’ वाचविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून सिमेंटचे पॅचवर्क करत काही ठिकाणचे खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. निवडणूक जवळ आल्यामुळे भर पावसात नियम डावलून अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

काय आहे या पदाधिकाऱ्यांचे अभिवचन

येत्या निवडणूकीत संगमनेरकरांनी भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष पालिकेची सत्ता द्यावी. या काळात प्रामाणिक, पारदर्शी, नियोजनपुर्ण व गुणवत्तेवर काटेकोर लक्ष देत एक सुशासन देण्याचे अभिवचन देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 129
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.