Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिलासादायक गिफ्ट । एकापाठोपाठ एक प्रकल्प बाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे पाऊल
विकास

दिलासादायक गिफ्ट । एकापाठोपाठ एक प्रकल्प बाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे पाऊल

बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी कौशल्य विभागाच्या पुढाकारातून १ लाखाहून अधिक रोजगारासाठी सामंजस्य करार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2022Updated:17/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

एकापाठोपाठ एक मोठे उद्योग राज्याबाहेर निघून गेल्यानंतर टिकेचे धनी बनलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने रोजगाराच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. प्रकल्पाच्या प्रश्नावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकारण रंगलेले असतांना आता सरकारने बेरोजगार युवकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे.

राज्यातील कौशल्य विभागाच्या पुढाकारातून १ लाख २१ हजार बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सामंजस्य करार करण्यात आले आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार पार पडला.

या सामंजस्य कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. उद्योगांनी त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण द्यावे. यातून उद्योगांसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ सुलभतेने मिळू शकेल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

सरकारच्या या निर्णयामुळे पुढील काळात राज्यात रोजगार निर्मीती होईल. सरकारने केलेल्या या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकींग, हॉस्पिटॅलिटी, एव्हीएशन अशा अनेक क्षेत्रात ही नोकर भरतीची संधी उपलब्ध होणार आहे. यातून तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकऱ्या दिल्या जातील.

महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकार हे करार करीत आहे. त्यासाठी गेल्या दिवसांपासून कौशल्य विभागाचे अधिकारी यावर काम करीत आहेत. रोजगार हा संवेदनशील विषय असल्याने या प्रकारच्या करारामुळे राज्यात आता १ लाख २१ हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

तर यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आम्हीदेखील ७५ हजार नोकऱ्या देणार आहोत. जे लोक सेवा पुरवठादार म्हणून काम करतात अशा लोकांना आम्ही बोलावले आहे. याद्वारे खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या माध्यमातून १ लाखापेक्षा अधिक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 122
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.