महाराष्ट्र संवाद न्यूज
अल्पवयीन मुलीस रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केली आहे. संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथे हा प्रकार घडला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संगमनेर खुर्द येथे तक्रारदाराचे कुटुंबीय राहत असून ते मोलमजुरी करतात. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपी गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तक्रारदार कामावर जाण्यासाठी कुठले असताना त्यांची सोळा वर्षे सहा महिने वयाची मुलगी त्यांना अंथरुणावर झोपलेली दिसून आली नाही.
त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात संगमनेर शहरात आणि नातेवाईकाकडे तिचा शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे तिला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केले.
शहर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

