Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वादाला फुटले तोंड| छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला हे अख्या जगाला माहिती : मुख्यमंत्री शिंदे
राजकारण

वादाला फुटले तोंड| छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला हे अख्या जगाला माहिती : मुख्यमंत्री शिंदे

छत्रपतींची तलवारच भाजपच मुंडक छाटणार आहे : खासदार संजय राऊत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय. हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर “छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. करारा जवाब मिलेगा असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं अजब विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची लाड यांनी केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे रविवारी समृद्धी महामार्गाची पाहणी दरम्यान त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तर या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे भाजपावर टीका केली आहे.

“भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार” शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?” असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला केला आहे. याचबरोबर “करारा जबाब मिलेगा!” असं म्हणत कोण प्रसाद लाड? तो काय दत्तू वामन पोतदार आहेत का? रोज भाजपाचा एक नेता उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. ते इतिहासतज्ज्ञ आहेत का? भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करेल. शिवाजी महाराजांची तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटेल. यांच्या स्वप्नात अफझलखान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी बोलतो म्हणून हे नेते असं बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची यांची लायकी आहे का?असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी नवा नीती आयोग स्थापन करून त्यावर स्वतःच्या मर्जीतील बिल्डर बसवले. त्याप्रमाणे भाजपाने इतिहास मंडळाची स्थापना करून आपली माणसं बसवली आहेत का? असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला.हे ठरवून चाललंय का? औरंगजेब अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत.शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?
करारा जबाब मिलेगा! pic.twitter.com/Y4jjVLR9SZ

— Sanjay Raut (@rautsanjay61) December 4, 2022

तर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर जास्त भाष्य न करता छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला हे अख्ख्या जगाला माहीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी समृद्धी संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आज हिंद हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा आहे. ११ तारखेला देशाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण होईल. नागपूर ते शिर्डी ५२० किलोमीटर समृद्धी महामार्ग आहे, तो लोकांसाठी खुला होईल. लोकांची मोठी सोय होणार आहे.

त्यामुळे त्याच्या नियोजनाची तयारी पाहण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री आलेलो आहोत. विदर्भ, मराठवाड्याला जोडणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या कामाच्या पूर्णत्वाकडे त्यांनी जातीने लक्ष दिलं होतं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 143
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.