Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी
राजकारण

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी

गंभीर चुकीबद्दल माफी मागितली नसल्याने राष्ट्रवादीकडून केले जातेय लक्ष्य
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे सांगणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानाबद्दल ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

आमदार लाड यांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून यामुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष आधीच अडचणीत सापडला असताना लाड यांचे वक्तव्य पक्षासमोर अडचणी निर्माण करणारे ठरले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करत त्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय, त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केला आहे. स्वराज्य कोकण भूमी त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं. तसेच माझी चूक देखील मी सुधारली होती. तुम्ही व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल.

त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला, असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय जाधवरावांनीदेखील म्हटलं, तेसुद्धा मीडियात आलेलं आहे.

परंतु तरीदेखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करीत आहे. त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असंही प्रसाद लाड म्हणालेत.

छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. pic.twitter.com/Nyps1jqs7U

— Prasad Lad (@PrasadLadInd) December 4, 2022

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 113
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.