महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक संगमनेर शहर मध्ये फरार आरोपीच्या शोधासाठी आले असताना पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या माहितीवरून या पथकाने समनापुर शिवारामध्ये कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या चार जिवंत गोवंश जनावरांची मुक्तता केली.
शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रणजीत पोपट जाधव यांच्या तक्रारीवरून फरार आरोपी कासिम आसद कुरेशी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी बापूसाहेब फोलाने, विशाल दळवी, राहुल सोळुंके, रोहित येमुल, सागर ससाने, उमाकांत गावडे यांचे पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रविवारी रात्री वॉन्टेड असलेल्या फरार आरोपीचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याकडून समनापुर गावच्या शिवारात शम्माबी युसुफ शेख यांच्या मोकळ्या जागेत कासिम आसद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) याने कत्तलीच्या उद्देशाने वंश जनावरे विना चारापाणी न देता निर्देश देणे बांधून ठेवले असल्याची माहिती पथकाला देत कारवाईच्या सूचना दिल्या.
माहिती मिळताच पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस कर्मचारी व्हि. डी. जाधव, एस. टी. दाभाडे, ए. एन. गवळी, एल. आर. भांगरे यांना सोबत घेत नमूद ठिकाणी रविवारी रात्री साडेअकरा वाजता कारवाई केली असता तेथे पथकाला तीन गाई आणि एक बैल असा सुमारे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पथकाने चारही जनावरांची मुक्तता केली. आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन पुढील तपास करत आहे.

