महाराष्ट्र संवाद न्यूज
पंतप्रधान किसान सन्मान निधीची (पीएम किसान) नगर जिल्ह्यामध्ये ९० हजार ११३ लाभार्थ्यांची बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित आहे. केंद्र शासनाकडून या योजनेचा १३ वा हप्ता वितरण करण्यापूर्वी ही बँक खाती आधार संलग्न असणे अनिवार्य आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार संलग्न करून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांवरच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली खाती आधार संलग्न करण्याची आवश्यकता आहे. लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न असतील तर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता नाही.
आधार संलग्न केलेल्याच बँक खात्यांमध्ये यापुढील लाभ वितरीत केला जाणार असल्याने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्याने स्वतः संबंधित बँकेत जाऊन बँक खाते आधार संलग्न करून घेण्याची आवश्यकता आहे.
या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले बँक खाते ३१ डिसेंबर अखेरपर्यंत आधार संलग्न करून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

