Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रीय ग्राहक दिनी तहसिलदारांनी घेतला विविध प्रश्‍नांचा आढावा
प्रशासन

राष्ट्रीय ग्राहक दिनी तहसिलदारांनी घेतला विविध प्रश्‍नांचा आढावा

त्वरित योग्य सेवा देण्याच्या संबंधितांना दिल्या सूचना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अकोले : पंचायत समिती सभागृहात झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय ग्राहक दिनात ग्राहक, नागरिकांनी विविध तक्रारी उपस्थित केल्या. याबाबत तहसीलदारांनी संबंधित खात्यांना सुचना देऊन त्वरीत योग्य सेवा देण्यास सांगितले जाईल असे सांगितले.

ग्राहक दिनात विविध विषयावर सखोल चर्चा होऊन ग्राहकांनी अनेक तक्रारी मांडल्या. यात प्रामुख्याने अकोले, देवठाण, सिन्नर रस्त्याचे रूंदीकरणाचे कामात खडीवर माती टाकल्याचे फोटो अधिकार्‍यांना दाखविण्यात आले. तर कोल्हार घोटी राज्य मार्गाचे काम अत्यंत संथगतीने चालु असल्याची तक्रार देखील माडण्यात आली. शिवाय रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तहसिलदार सतीश थेटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना तातडीने सुचना दिल्या.

याशिवाय अकोले तालुक्यातील आदिवासी गावामध्ये ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक मुख्यालयात थांबत नाही, पशुधन अधिकारी बर्‍याच गावांमध्ये नसतात, त्यामुळे जनावरांवर खाजगी डॉक्टरांकडून महागडे उपचार करावे लागतात, रेशनचे धान्य दर महिन्यास मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. तर लव्हाळवाडी, पाचनई येथील आंगणवाडी बंद असल्याने मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सेतु कार्यालयात व आधार कार्ड सेंटरला सुरू असलेली लुट, नगर अर्बन बँकेत ठेवलेली रक्कम परत मिळत नाही, ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा, साई अर्पण ट्रॅक्टर कडून सेवा मिळत नाही, शासकीय कार्यालयात राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींचे फोटो लावले जात नाहीत.

स्टेट बँक, महाराष्ट्र बँक शाखा राजूरमध्ये योग्य सेवा मिळत नाही, विज प्रश्‍न, कॅनॉल, रस्त्यांच्या तक्रारी, खते व बि-बियाणांमध्ये होत असलेली फसवणुक अशा अनेक तक्रारी यावेळी ग्राहकांनी मांडल्या.

प्रा. सुनिल शिंदे, ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे, राम रूद्रे, ज्ञानेश पुंडे, माधवराव तिटमे, प्रा. रामनाथ काकड, वसंत बाळसराफ, विनय वाकचौरे, बाळासाहेब बनकर, संतोष मुतडक, अ‍ॅड. राम भांगरे, अ‍ॅड. दीपक शेटे, शोभा दातखिळे, प्रतिभा सूर्यवंशी, नंदु गायकवाड, सखाराम खतोडे, अनंत घाणे, सुनिल देशमुख, रामदास पांडे, दत्ता ताजणे, शुभम खर्डे, सुदिन माने, सुदाम मंडलिक, हरिभाऊ अस्वले, नवनाथ आवारी, महसुलचे नायब तहसिलदार उबाळे, सहाय्यक निबंधक कांदळकर, मार्केट कमिटीचे आळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेळके, आढारी, गटविकास अधिकारी शेळके, शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, पुरवठा निरीक्षक रसिक सातपुते, पुरवठा लिपीक दत्तात्रय कोल्हाळ, नगर पंचायतचे अनिल बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रमोद मंडलिक यांनी केले तर आभार रमेश राक्षे यांनी मानले.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 83
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar29/08/20260

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात…

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.