Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दहशतीचे राजकारण संगमनेरच नव्हे तर नगर जिल्हादेखील सहन करणार नाही : माजी महसूल मंत्री थोरात
आंदोलन

दहशतीचे राजकारण संगमनेरच नव्हे तर नगर जिल्हादेखील सहन करणार नाही : माजी महसूल मंत्री थोरात

वाळू, खडी मिळत नसल्याने रस्त्यावर उतरलेल्या हजारोंच्या महाआक्रोश मोर्चात वक्त्यांचा आक्रोश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2023Updated:07/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

खोके सरकार, बोके सरकार आणि द्वेषाने वागणाऱ्या महसूलमंत्र्यांमुळे आमची उपासमार

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : आपण अनेक वर्ष महसूल मंत्रीपद उपभोगले आहे. मात्र आपण कधीही अशा प्रकारचे राजकारण केले नाही. प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका होती. मात्र काही लोक आता आपल्या तालुक्याचे नुकसान करायला निघाले आहे. त्यांना येथील विकास बघवत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दहशतीचे राजकारण त्यांना आपल्या तालुक्यात व जिल्ह्यात करावयाचे आहे. मात्र संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा हे कदापिही होऊ देणार नाही. असा थेट इशारा माजी महसूल मंत्री व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता दिला.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गौण खनिजासंबंधी घेतलेल्या धोरणामुळे बांधकाम व्यवसायाशी निगडित कामे ठप्प झाली असून या क्षेत्राशी निगडित असलेल्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेल्या हजारो रोजंदारी पुरुष व महिला कामगार व त्यांना रोजंदारी देणारे व्यावसायिक शनिवारी महाआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे या मोर्चाला या व्यवसायाशी निगडित राजकीय पदाधिकारी वगळता अन्य राजकीय नेत्यांची अनुपस्थिती होती.

मालपाणी लॉन्स पासून सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे भव्य सभेत रूपांतर झाले. खोके सरकार, बोके सरकार आणि महसूल मंत्री यांच्या विरोधातील घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. रोजंदारी पळविणाऱ्या सरकारवर टीका करणाऱ्या वक्त्यांमध्ये महिलांचादेखील समावेश होता.

थोरात म्हणाले, राज्यात सहा महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार आले आणि निळवंडेसह अनेक बांधकामे बंद पडली. संगमनेरसह जिल्ह्यातील काही तालुक्यांवर जाणीवपूर्वक गौण खनिजाच्या नावाखाली अन्यायकारक निर्बंध लावले गेले. त्यामुळे शासकीय विकास कामांसह, खासगी बांधकामे, रस्ते, इमारती, घरकुले, शाळा खोल्या, अंगणवाडीची बांधकामे रखडली. गौण खनिजाच्या नावाखाली अन्यायकारक दंड करण्यात आले. बांधकामे बंद असल्याने अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडले आहे. बांधकाम हा एखाद्या विभागाच्या विकासात महत्त्वाचा भाग आहे. तोच थांबवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.

यावेळी अरविंद पवार, किसन पानसरे, अजिंक्य वरपे, सुभाष दिघे, व्यंकटेश देशमुख, दिपाली वर्पे, अनुपमा शिंदे, निलेश कडलग, योगेश पवार, प्रा. बाबा खरात, मोहन करंजकर, प्रदीप हासे, रामहरी कातोरे, के. के. थोरात, नरेंद्र पवार, बी आर चकोर आदींनी भाषणातून सरकारवर टीका केली. महाआक्रोश मोर्चामध्ये वडार समाजाचे कामगार गाढव बिऱ्हाडासह सहभागी झाले होते.

खांदेदुखीने त्रस्त असतानाही थोरात यांनी मोबाईलद्वारे केल्या आपल्या भावना व्यक्त

महाआक्रोश मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चेकरांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित होते. हिवाळी अधिवेशना दरम्यान पडल्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू असल्याने व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थोरात यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला असताना देखील ज्यांनी मुंबईतून संगमनेरमधील मोर्चाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 318
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.