Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचा महसूल विभाग ॲक्शन मोडवर; वाळू वाहतूक करणारी पाच वाहने पकडली
प्रशासन

संगमनेरचा महसूल विभाग ॲक्शन मोडवर; वाळू वाहतूक करणारी पाच वाहने पकडली

दंडात्मक कारवाई करणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : दिवसेंदिवस गंभीर बनलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात संगमनेरच्या महसूल विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. एकाच वेळी अवैध वाळूची वाहतूक करणारी तब्बल पाच वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली आहेत. या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूजला’ दिली.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूलच्या पथकाने शहर व परिसरातून ही वाहने पकडली आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने गौण खनिजाबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. याचा फटका वाळू तस्करांना बसला असून महसूल खात्याने अवैध वाळू तस्करी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात अवैध गौण खनिजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महसूल खाते ॲक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे वाळू तस्करांनी ट्रॅक्टरसह मोठ्या वाहनांचा वापर टाळत वाळू तस्करीसाठी छोटी वाहने वापरण्यास सुरुवात केली. छोट्या वाहनातून वाळू तस्करी होत असल्याने त्या विरोधात महसूलच्या पथकाने मंगळवारी पहाटे विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार उमाकांत कडनोर व गणेश तळेकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार तलाठी पोमल तोरणे व अन्य तहसीलदारांच्या पथकाने ही वाहने पकडली.

पथकाने पकडलेल्या वाहनांमध्ये मंगळापूर येथे जीपमधून, राजापूर येथे पिकअप जीपमधून, कासारवाडी येथे ॲपे रिक्षातून, खांडगाव येथे पिकअपमधून तर शहरात रिक्षातून वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. पथकाने ही पाचही वाहने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे शासनाने गौण खनिजा बाबतीत आणलेले निर्बंध झुगारून अवैधरित्या वाळू वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या विरोधात महसूल प्रशासनाने कारवाई संदर्भात सातत्य राखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 189
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.