Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मारुती व्हॅनमधून आलेल्या चार पोलिसांनी टेम्पो लांबविला
गुन्हेगारी

मारुती व्हॅनमधून आलेल्या चार पोलिसांनी टेम्पो लांबविला

टेम्पोत गांजा असल्याचे सांगत तपासणीसाठी पोलीस स्टेशनला नेत असल्याचा केला बहाणा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : मारुती व्हॅनमधून आलेल्या चौघा तोतया पोलिसांनी रोकड रकमेसह टेम्पो लांबविण्याची घटना शहरालगतच्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावर घडली आहे. थेट पोलीस असल्याची बतावणी करत टेम्पो लांबवल्याने संगमनेरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

या संदर्भात मुंबई येथील शामू रज्जु गौड याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक गौड हा १२ जानेवारीला पुणे येथून टेम्पोमध्ये टिशू पेपरचा माल घेऊन नाशिक येथे जात होता. संगमनेरच्या पावसा येथील टोल नाक्यावर चहापाणी घेऊन तो नाशिकच्या दिशेने सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान मार्गस्थ झाला असताना बाह्यवळण रस्त्यावर मालपाणी तंबाखू कारखान्याजवळ पिवळ्या रंगाच्या काळ्या काचा असलेल्या विना क्रमांकाच्या मारुती कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्याला टेम्पो थांबविण्यास भाग पाडले. टेम्पो चालकाने एका चहाच्या टपरीजवळ टेम्पो थांबविला असता त्यातून खाली उतरलेल्या चार इसमानी त्याला ते पोलीस असल्याचे सांगितले. त्यांनी टेम्पोमध्ये गांजा असल्याचे सांगत टेम्पोची तपासणी करावयाची आहे असे सांगत टेम्पोची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले.

त्यातील एकाच्या हातात पोलिसाकडे असते तसे काठी देखील होती. त्यामुळे ते पोलीसच असावेत असे टेम्पो चालक गौड याला वाटले. पोलीस असल्याचा बहाना करणाऱ्यांनी त्याला टेम्पोमध्ये गांजा भरलेला असल्याची माहिती मिळाली असून पोलीस ठाण्यात नेऊन टेम्पोची तपासणी करावी लागेल, असे सांगत त्यापैकी एकाने त्याच्या हातातील काठीने टेम्पोच्या दरवाजावर मारले. त्यामुळे दरवाज्याची काच देखील फुटली.

पोलीस असलेल्यांनी आम्हा दोघाजणांना त्यांच्याकडील कारमध्ये बसविले. गौड यांच्याकडील टेम्पोची चावी घेत त्यातील एकाने यांना घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला या आम्ही टेम्पो घेऊन पुढे जातो असे सांगितले.

मारुती कार चालकाने त्याच्याकडील मारुती कार दहा ते बारा किलोमीटर पुढे नाशिकच्या दिशेने तेथे वाहन चालक व त्याच्या साथीदारास खाली उतरवून दिले. तुम्ही येथे थांबा तुमची गाडी थोड्या वेळात आणून देतो असे सांगून त्यांनी तिथून पोबारा केला. ते रात्रभर न परतल्याने परिसरात टेम्पोचा शोध घेऊन गौड आणि त्याचा साथीदार दोघे पोलीस स्टेशनला आले.

त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात चार तोतया पोलिसांनी आपली फसवणूक करत टेम्पोसह त्यातील दोन मोबाईल, तीस हजार रुपयांचे रोकड लंपास केल्याची तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 303
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.