Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने व्यापाऱ्याच्या घरावर टाकला दरोडा; पिस्तूलसह चाकू, कोयत्याचा धाक दाखवत मारहाण
गुन्हेगारी

सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने व्यापाऱ्याच्या घरावर टाकला दरोडा; पिस्तूलसह चाकू, कोयत्याचा धाक दाखवत मारहाण

एसपी साहेब संगमनेरात पोलिसांचा धाक संपल्याने प्रभारीराज थांबवा, खमके अधिकारी द्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : नासिक-पुणे महामार्गालगत बस स्थानकाजवळ गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या घरातील व्यक्तींना मारहाण करत सुमारे अडीच लाखाच्या रोकड रकमेसह साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.
शहरातून जाणारा नासिक-पुणे महामार्ग प्रचंड वर्दळीचा असून बस स्थानकापासून काही अंतरावर सह्याद्री विद्यालया शेजारी असलेल्या व्यापारी केदारनाथ भंडारी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. महामार्गापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर पडत असलेल्या या दरोड्याची चाहूल देखील कोणाला लागली नाही. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने भंडारी यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी घरामध्ये भंडारी यांच्या पत्नी शोभना मुलगा पार्थ आणि त्याचा मित्र प्रणव असे तिघेजण होते. दरोडेखोरांनी या तिघांनाही त्यांच्या हातातील पिस्तूल, चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. दरोडेखोरांच्या दहशतीने घाबरलेल्या शोभना भंडारी यांनी त्यांची विनवणी सुरू केली. मात्र त्यांच्या विनवणीला धुडकावत दरोडेखोरांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेली दोन लाख साठ हजार रुपयांची रोकड, साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि विवो कंपनीचा मोबाईल भंडारी यांच्याकडून काढून घेतला.
घरातील तीनही व्यक्तींना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या दरोडेखोरांचा धुमाकूळ बराच वेळ सुरू असताना देखील आसपास कोणालाही याचा सुगावा लागला नाही. लुटीचा माल घेऊन दरोडेखोरांनी पोवारा केल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आले.
शुक्रवारी रात्री उशिराने दोन वाजण्याच्या सुमारास शोभना भंडारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्या विरोधात शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.

एस पी साहेब संगमनेर मधील गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक पूर्णतः संपला असून गुन्हेगारीमुळे शहर असुरक्षित बनत असल्याचे दिसत आहे. संगमनेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून खून दरोडे आणि चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. चोर, दरोडेखोरांच्या टोळ्या दहशत निर्माण करत असताना पोलिसांना मात्र गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात पूर्णतः अपयश आले आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा तपास अद्यापही तपासावर असताना चोऱ्या करणाऱ्यांच्या टोळक्यांनी उच्छाद मांडला आहे. सततच्या घटनांनी संगमनेरकर भीतीच्या सावटाखाली आहे. जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याकडे असताना देखील संगमनेरमध्ये पोलीस खात्यात प्रभारी राज सुरू आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी खमक्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. शहर पोलीस दलातील एकही अधिकारी गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यास यशस्वी ठरल्याचे दिसत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरसाठी एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी संगमनेरकरांमधून होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 846
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.