Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार यांच्या तक्रारीनंतर आणखी एका चौकशीचे शुक्लकाष्ट; आता कोणावर होणार कारवाई
सामाजिक

माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार यांच्या तक्रारीनंतर आणखी एका चौकशीचे शुक्लकाष्ट; आता कोणावर होणार कारवाई

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ मंदिरालगत म्हाळूंगी नदीवरील खचलेल्या पुलाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता याप्रकरणी कोणावर कारवाई होते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात म्हाळूंगी नदीला आलेल्या पुरामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणारा पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरून परिसरातील नागरिकांना ये जा करता येत नाही. या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत असतानाच माजी उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस जावेद जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करत मानवनिर्मित चुकांमुळे पूल खचला असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.

जहागीरदार यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीत २० वर्षापूर्वी म्हाळूंगी नदीवर स्वामी समर्थ मंदीरजवळ बांधण्यात आलेला पुल मानव निर्मित चूकांमुळे शतीग्रस्त झालेला असल्याचे म्हटले होते. संगमनेर नगर पालिकेची भूमीगत गटार योजना मंजूर होऊन त्याचे काम सुरु करण्यात आले होते. या भूमीगत गटार योजनेतील गटारीचे पाईप क्रॉसींग करताना संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे व ठेकेदारांशी मिलीभगत असल्यामुळे पाईप लाईन क्रॉसींगचे काम करताना म्हाळूंगी नदीपात्रातील पुलाच्या फौंडेशनला धक्का लावत ते डॅमेज करण्यात आले.

भूमीगत गटार योजनेतील पाईप लाईनचे काम करताना कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. पुलाच्या फौंडेशनला पाईप लाईनच्या कामांमुळे धक्का लागल्याने पुल कमकुवत झाला होता. त्यातच पावसाळ्यात म्हाळूंगी नदीला पाणी आल्यामुळे पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सदरचा पूल मानवी चुकांमुळे क्षतीग्रस्त झाला असून संगमनेर नगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेमुळे या पुलाचे नुकसान झाले आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांची तसेच या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या संगमनेरकरांची मोठ्या प्रमाणात या पुलावरून वर्दळ असते. खचलेल्या या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याची व दोषी असलेल्या पालिकेच्या बांधकाम विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यांसह पालिकेचे पदाधिकारी व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी केली होती.

का केली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
म्हाळूंगी नदीवरील पूल कशामुळे खचला हे स्पष्ट झालेले असतानाही संगमनेर नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप पर्यंत संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्याने जहागिरदार यांनी जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे साकडे घालत बांधकाम विभागामार्फत या पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात केली आहे. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या पालिकेच्या पदाधिकार्‍यांसह, बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर शासकीय मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान केल्याच्या कारणाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये ४ जानेवारीला केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
जहागीरदार यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सदर पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन हा पूल नेमका का खचला? याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याने पुलाच्या पायाला धक्का पोहोचवत या पुलाखालून देण्याचे पाईप नेण्यासाठी आग्रही असलेल्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याने व कारवाईचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागणार असल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 858
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.