महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या रिक्त जागी सिदराम सालीमठ यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आयएएस भोसले यांच्यासह राज्यातील अन्य काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून निधी चौधरी यांचाही समावेश आहे.
राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या रिक्त जागी सिदराम सालीमठ यांची, सिडको ओरंगाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी तर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बीडचे जिल्हाधिकारी असलेल्या राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून याशिवाय मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी असलेल्या श्रीमती निधी चौधरी यांची मुंबईत सेल टॅक्सच्या ज्वाईन्ट कमिशनरपदी बदली करण्यात आली आहे.

