Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात भविष्यकार खूप झाल्याने सरकारच्या भविष्याबाबत प्रसिद्धीचा स्टंट; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सामाजिक

राज्यात भविष्यकार खूप झाल्याने सरकारच्या भविष्याबाबत प्रसिद्धीचा स्टंट; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठांना आधार देण्याचे काम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. सध्या राज्यात भविष्यकार खूप तयार असल्याने सरकारच्या भविष्याबाबत केली जाणारी वक्तव्य फक्त प्रसिध्दीचा स्टंट असल्याची टिका करीत राष्ट्रीय वयोश्रीच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना आधार देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरु आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकांसाठी सुरु केलेल्या योजनांचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यात समाधान असल्याचेही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय वयोश्रीच्या माध्यमातून संगमनेर मधील 1635 जेष्ठ नागरीकांना मंजूर झालेल्या सहायक साधन साहित्याचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ नेते वसंतराव गुंजाळ, वसंतराव देशमुख, बापूसाहेब गुळवे, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, उपाध्यक्ष जावेद जहागिरदार, महिला अध्यक्षा प्राजक्ता बागुल, अमोल खताळ, रविंद्र थोरात, बापू देशमुख, अशोक कानवडे, संदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते तालुक्यातील 515 घरकुलांचे प्रातिनिधीक स्वरुपात ऑनलाईन भुमिपुजन करण्यात आले. तसेच अकलापूर येथील विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या बर्डे कुटूंबीयांना मंजूर झालेल्या घरकुलाचे पत्रही देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ तालुक्यातील 6 हजार लोकांना मिळणे ही पहिल्यांदाच घटना घडत आहे. देशातील ज्येष्ठ नागरीकांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी या योजनेची सुरुवात केली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील 42 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला.
केंद्र सरकार मागील आठ वर्षापासून विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरीकांना आधार देत आहेत. समाजातील शेवटचा माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरु असलेले काम हे केवळ विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून, कोव्हीड संकटातही देशाच्या पाठीशी भक्कमपणे मोदीजींचे नेतृत्व उभे होते. जगातील इतर देशांची अवस्था पहाता या संकाटातून देश वाचविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानून मोफत लसिकरण आणि मोफत धान्य योजनेमुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला.
आयुष्यमान भारत योजनेपासून ते ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. 2050 सालापर्यंतचे नियोजन करुन प्रत्येक गावातील घरामध्ये नळाद्वारे पाणी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांचे काम गावोगावी सुरु झाले. राज्य सरकारनेही मागील 6 महिन्यात सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लम्पी संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनावरांचे मोफत लसिकरण करण्यात आले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारची यशस्वी वाटचाल सुरु असून, या सरकारच्या कामामध्येच विरोधकांना आता धडकी भरली.
सरकारच्या संदर्भात विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या बेछूट वक्तव्यांची खिल्ली उडवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विरोधकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. सरकार पडण्याच्या रोज तारखा ते देत आहेत. परंतू हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करुन आगामी काळातही भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचेच सरकार राज्यात यशस्वीपणे काम करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णाताई मालपाणी यांनी वयोश्री योजनेच्या प्रभावीपणे झालेल्या अंमलबजावणीचे कौतूक करुन या योजनेचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी विखे पाटील परिवाराने केलेल्या प्रयत्न महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. याप्रसंगी वसंतराव गुंजाळ, श्रीराम गणपुले यांचीही भाषणे झाली.

संगमनेरची सायकलपटू प्रणिता प्रफुल्ल सोमण हिला पुढील प्रशिक्षणासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देवून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने तिचे प्रायोजकत्व स्विकारले आहे. या मदतीचा धनादेश डॉ. सौ. स्वाती सोमन यांना मंत्री विखे पाटील यांनी प्रदान केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 399
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.