महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सिद्धराम सालीमठ यांनी बुधवारी बदली झालेले जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या सरकारने मंगळवारी बदल्या केल्या होत्या. भोसले यांच्या जागेवर सरकारने सिद्धाराम सालीमठ यांचे नियुक्ती केली. बुधवारी सालीमठ यांनी लगेचच भोसले यांच्याकडून नव्या पदाचा पदभार स्वीकारला. डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली मुंबईसह उपनगर जिल्हाधिकारी पदावर झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हा पदभार समारंभ पार पडला. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील
अधिकाऱ्यांनी देखील डॉ. भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उज्वला गाडेकर, ग्रामपंचायत विभागाच्या कदम, गौण खनिज विभागाचे अधिकारी वसीम शेख यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

