महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजाच नव्हते तर ते संत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनाकार नव्हते तर संत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ योद्धा नव्हते तर ते संत होते. महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. असे प्रतिपादन शंकर गायकर यांनी केले.
गायकर म्हणाले, सध्या गोहत्या प्रकरणे मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्याला देशपातळीवरील काही राजकीय पक्षाचे नेते खतपाणी घालत आहेत. गोर-गरिबांना चुकीचे आणि खोटे इतिहास सांगून धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद प्रकार ग्रामीण भागात पोहोचला आहे. अखंड हिंदुस्तानची फाळणी देखील लव्ह जिहादसारख्या गोष्टीतून झाली आहे.
सनातन हिंदू धर्म हा कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही, मात्र हिंदूंचा द्वेष करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे. पृथ्वीवरील पहिला धर्म हिंदू आहे. तो केवळ धर्म नाही तर ती एक संस्कृती आहे. ज्यात राष्ट्रप्रेम आणि अडल्या नडलेल्यांची सेवा करणे, हेच खरे संत कार्य आहे आणि हाच हिंदू धर्म. हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक, दत्त देवस्थान देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी प्रतिपादन केले.
माजी मंत्री मधुकर पिचड यांना सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला व शंकर गायकर यांचा विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मंत्री नियुक्तीबाबत अकोले तालुक्याच्यावतीने नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतून मोठी गर्दी झाली होती.
बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, बाबासाहेब महाराज कोंढार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप भाटे यांनी केले.

