Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित करा : संघर्ष सामाजिक संघटनेची मागणी
सामाजिक

म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित करा : संघर्ष सामाजिक संघटनेची मागणी

श्रेय कोणीही घ्या पण काम करा, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत नको
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर
संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. खचलेल्या या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेने केली आहे. अन्यथा यासाठी संस्थेच्या वतीने संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे.

स्वामी समर्थ मंदिरालगत असलेल्या या पुलावरून साई मंदिर, प्रवरा नदी, गंगामाई घाट, पंपिंग स्टेशन, कासारवाडी, साईनगर, घोडेकर मळा, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालय, मालपाणी हेल्थ क्लब आदी ठिकाणी ये-जा करता येते. साधारणत: ऑक्टोंबरमध्ये या भागाला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल मानवनिर्मित चुकांमुळे कसला आहे. जवळपास सहा महिन्याहून अधिक काळ हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची तसेच या भागात येणाऱ्या-जाणाऱ्यांची तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. मोठ्या लोकसंख्येचा हा भाग गणला जातो.

पूलाला पडलेली खाच

असे असले तरी, पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नगरसेवक, राजकीय नेते, आमदार, खासदार या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने बघताना दिसत नाही. श्रेय वादात हा विषय अडकत चालला असल्याची चिन्ह दिसत आहे. सध्या पालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर हा प्रश्न सुटू शकतो. मात्र त्यांनाही या प्रश्नात स्वारस्य नसल्याचे दिसते.

त्यामुळे या प्रश्नात आता संघर्ष सामाजिक संस्थेने लक्ष घातले असून पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने त्वरित करावे. अथवा यासाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास या प्रश्नासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठे जन आंदोलन उभे केले जाण्याची चिन्ह आहेत.

पूल नेमका कसा तुटला…

म्हाळुंगी नदीवरील हा पूल अनैसर्गिक पद्धतीने तुटला आहे. एसटीपी प्लांटच्या ड्रेनेजचे काम करताना या फुलाचे फाउंडेशन तोडले गेले. याकडे देखील शासकीय पातळीवर दुर्लक्ष होतांना दिसत आहे. वास्तविकता संबंधित दोषींवर कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही घडले नाही. मात्र हा विषय बाजूला ठेवला तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या पुलाचे काम त्वरित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाने हे काम तातडीने करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संग्राम जोंधळे, उपाध्यक्ष अब्दुल्ला हसन चौधरी, दैनिक प्रवरातीरचे संपादक शिवपालसिंह ठाकुर, केशवराव दत्ता कांडेकर, माधव गिरी तसेच साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 204
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.