Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमरावतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न; एक जण ताब्यात… निफाडमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवारांनाही घेराव
आंदोलन

अमरावतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न; एक जण ताब्यात… निफाडमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवारांनाही घेराव

कांदा प्रश्न पेटला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले असताना आता कांद्याचा प्रश्न पेटला असल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले.

कमी कांद्याच्या उत्पादनामुळे जगातील अनेक देशांना रडवत असलेला कांदा आता मात्र आपल्या राज्यात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन झाले असतानाच आता राज्यात कांदा प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होताना दिसू लागला आहे. एकीकडे विरोधकांनी या प्रश्नी सभागृहात आवाज उठवताना आता आंदोलने देखील सुरू केले आहे.

अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न झाल्याने शेतकऱ्यांचा सरकार विरोधात आक्रोश दिसू लागला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनावर कांदे फेकल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून ही कांदा फेक करण्यात आल्याची माहिती समजत आहे.

जागतिक बाजारपेठेत अभूतपूर्व कांदा टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे परदेशात कांद्याला सोन्याचा भाव मिळत आहे मात्र आपल्याकडे सरकारने लादलेल्या निर्यात बंदीमुळे हाच कांदा आता शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार यांना देखील नाशिक मधील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी घेराव घातल्याचा प्रकार घडला आहे. त्या लासलगाव येथील नाफेड कांदा खरेदी केंद्रावर कांदा खरेदीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना पवार म्हणाल्या, मी नाफेडची खरेदी करण्यासाठी आग्रह केला. तुम्ही मात्र विरोध करत आहात. आजपर्यंत सरकार लाल कांदा खरेदी करत नव्हते. आता तो आम्ही खरेदी करत आहोत. केंद्र सरकारने पहिल्यांदाच लाल कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक पातळीवरचे कांद्याचे जे भाव आहेत त्या भावाने कांदा खरेदी करा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला असता त्या म्हणाल्या; जागतिक पातळीवर कांद्याला मागणी नाही. लाल कांदा लवकर खराब होतो. शेतकरी संघटनेने निवेदन द्याव की, नाफेड काही कामाच नाही, आम्ही नाफेडची कांदा खरेदी बंद करू.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 304
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.