Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बोंबाबोंब आणि संगमनेरी शिव्यांचा तडका
इतिहास

बोंबाबोंब आणि संगमनेरी शिव्यांचा तडका

संगमनेरी होळी बद्दल आठवणी व्यक्त करणारे लेखक संगमनेरमधील नाशिकस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

होळी विशेष ● रवींद्र एरंडे
अस्सल संगमनेरी बोंबाबोंब ऐकायची आणि सहन करायची असेल तर, संगमनेरच्या होळीमध्ये सामील व्हायला हवं. बदलत्या काळानुसार होळी उत्सवात बदल झाला असल्यास तरी जुन्या होळीच्या आठवणी कायम आहेत.

होळी साजरं करणारं मंडळ आठवड्यापासूनच तयारीला लागतं. पूर्वी लहानपणी घरोघरी फिरून गोवर्‍या (गवर्‍या) मागीतल्या जात. वखारीतून लाकडं आणली जात, सायंकाळी होळीभोवती शेणसडा, रांगोळी, पूजा करुन होळी पेटवली जायची. मग गल्लीतल्या बायाबापड्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायच्या. तांब्यातील पाण्याने प्रदक्षिणा मारायची. खोबर्‍याची वाटी जाळायची.त्याचा प्रसाद वाटायचा.

“होळीच्या गवर्‍या पाच पाच…होळीपुढं नाच नाच” असा सूर निघायचा. तो साधारणतः साडे आठ पर्यंत… नंतर होळकरी पोरं टप्प्याटप्प्याने घरी जेवण करुन यायची आणि मग खरा शिमगा सुरु व्हायचा. आम्ही संगमनेर नगरपालिकेसमोर राठी सरांच्या समोरील वाड्यात रहायचो. आमच्या पोरांची होळी राठी सरांच्या घरासमोर लहानशा म्हसोबा मंदिरासमोर रचली जायची. रात्री साडेनऊला होळीभोवती बोंबाबोब सुरु व्हायची. मग रस्त्याने जाणारा सायकलवाला… पापडवाला… पोरांना कोणीही चालायचा… आणि मग संगमनेरच्या गावराणी तालासुरातल्या शिव्या सुरु व्हायच्या.

खरं तर या शिव्या या “ओव्या ” वाटायच्या. इतकं छान यमक जुळवलं जायचं, संस्कारी पोरांचा सूर बसका तर बिनधास्त पोरांचा सूर टिपेला पोहोचायचा. रात्री ११ च्या पुढे कोणाची लाकडं, कोणाची खाट, कोणाची ओसरीतली लाकडी वस्तू, पोरं दोन, तीन दिवस अगोदर सर्व्हे करीत. आणि होळीच्या रात्री पत्र्यावर, धाब्यावर चढून ही सामग्री होळीसाठी आणली जायची. एखाद्याला जाग आली की तो शिवीगाळ करीत होळीपर्यंत पळत यायचा. आणि ढणाढणा पेटत असलेली बाज पाहून पोरांना शिव्या हासडायचा. त्याची पाठ वळली रे वळली की, “बाजेवाला लई शाहाणा……xxxxxx” चा गजर व्हायचा. आणि तो गृहस्थ सामूहिक शिव्यांचा प्रसाद खाऊन गपगुमान घरी जायचा.

रात्रीचा हा शिमगा बारा एकपर्यंत चालायचा. आणि मग सकाळी होळीतल्या विस्तवावर पाणी तापविण्यासाठी लगबग उडायची. अर्थात, तेव्हा शिमगा, होळी, बोंबाबोंब सहन करणारी माणसं होती. सहनशीलता होती. टिंगल, मस्करी सहन केली जायची, रात्री घरातली लाकडी वस्तू गायब झाली तरी, मनात राग न ठेवता, “कोणाचं काय चोरलं ?” आणि कशी मजा आली. या गप्पा सकाळी रंगायच्या.

एक मात्र खरं, होळीची बोंबाबोंब केलेलं संगमनेरचं पोरगं जगात कुठंही गेलं तरी, समोरच्याला जशास तसं उत्तर द्यायला मागंपुढं पहात नाही. कारण शिव्यांच्या ओव्या करुन त्या समोरच्या व्यक्तीला जहरी शब्दात पाजण्याचं बाळकडू त्याने बालपणीच प्राशन केलेलं असतं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 467
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

17/02/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.