Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देशमुख मळा शाळेत बाल आनंद मेळावा व मातृ-पितृ पूजन
शिक्षण

देशमुख मळा शाळेत बाल आनंद मेळावा व मातृ-पितृ पूजन

पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नको, चिमुकल्यांचा संदेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्ये मातृ-पितृ पूजन या उपक्रमाचे आयोजन करून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नको असा संदेशच जणू दिला.

शाळेत चिमुकल्यांनी आई-वडिलांचे पूजन करून आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आगळावेगळा दिन साजरा केला. आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सद्यस्थितीत पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, हग डे असे वेगवेगळे डे साजरे करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावत आहे.  मात्र, आपली भावी पिढी सात्विक आणि सुसंस्कृत व्हावी यासाठी चिमुकल्यांना चांगले संस्कार मिळावे या उदात्त हेतूने देशमुख मळा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने मातृ-पितृ पूजन व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात चिमुकल्यांनी आपल्या आई-वडिलांना खुर्चीत बसवून त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून त्यांचे देवा प्रमाणे पूजन केले. आपल्या चिमुकल्यांच्या या कृत्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू  तरळले, आणि चिमुकले विद्यार्थीही भावनिक झाले. याच मातृ-पितृ पूजन सोहळ्यामध्ये देशमुख मळा प्राथमिक शाळेने बाल आनंद मेळाव्याचे ही आयोजन केले होते. या आनंद मेळाव्यामध्ये हेच चिमुकले विद्यार्थी व्यावसायिक झाले आणि त्यांनी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला आणि फळे यांची विक्री करून पैसेही कमावले.

उपक्रमात मुलांनी भाजीपाला विकून पैसेही कमावले

पालकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने आपल्या चिमुकल्यांनी आणलेल्या फळभाज्या, भाजीपाला आणि फळांची खरेदी केली. ग्रामीण भागात मिळणारा सर्वच भाजीपाला या बाल आनंद मेळाव्यात विक्रीसाठी उपलब्ध होता. याचशिवाय चिमुकल्यांना अपेक्षित असलेला गोळ्या बिस्किटे, खाद्यपदार्थ सारख्या गोष्टीसुद्धा या बाल आनंद मेळाव्यात उपलब्ध होत्या.

याप्रसंगी पालकांनी बाल आनंद मेळाव्यात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांवरही ताव मारला. देशमुख मळा प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या बाल आनंद मेळावा व मातृ-पितृ पूजन या उपक्रमाने ग्रामस्थ व चिमुकल्यांचे आई-वडील अक्षरशः भारावून गेले होते.

उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनी या कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण जगात भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. आपण  पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपले खरे देव आई-वडील यांची पूजा केली पाहिजे. चिमुकल्या विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत या हेतूने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ अत्रे, सुभद्रा अत्रे, मनोज कडलग यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी सरपंच उज्ज्वला देशमाने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख उपस्थित होते. उपक्रमाचे संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व गट शिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी कौतुक केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 517
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.