Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे महत्वाचे आदेश…
प्रशासन

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे महत्वाचे आदेश…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर :
१४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संप काळात अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घेण्यासोबतच नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्व विभाग प्रमुखांनी घेण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक असल्याची सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. संप काळात संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांचेकडे दयावी.

आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्या. शासकीय कर्मचा-यांच्या संपाबाबत ‘केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याने कर्मचा-यांना अवगत करण्यात यावे. शासनाच्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत अशा सेवा विनखंडीत सुरू राहतील याची काळजी घ्या.

रुग्णालये, पाणी पुरवठा, स्वच्छता यासह जनतेशी निगडीत सर्व सेवा सुरळीत सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करा. सध्या 10 वी व 12 वी च्या परीक्षा सुरू असून या परीक्षांमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी शिक्षण विभागाने पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करावे. विभाग प्रमुखांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना कुठलीही रजा मंजूर करू नये. जनतेला सेवा मिळण्यात अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,164
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.