Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील प्रशासकीय फेरबदल: तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; लोकेश चंद्र मुख्यमंत्री कार्यालयाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव, अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिकेचे नेतृत्व
प्रशासन

राज्यातील प्रशासकीय फेरबदल: तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; लोकेश चंद्र मुख्यमंत्री कार्यालयाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव, अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिकेचे नेतृत्व

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले तुकाराम मुंढे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कामकाज पाहतील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी
राज्य शासनाने आज प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयापासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या फेरबदलात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली असून, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या त्या नवीन प्रमुख असतील.
याचसोबत कृषी आणि पदुम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून बदली करण्यात आली आहे.
महसूल व वन विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांच्याकडे आता मृद व जलसंधारण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले तुकाराम मुंढे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कामकाज पाहतील.
तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांची पदोन्नतीने कृषी विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये मणिक गुरसाळ यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी, तर लाहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्य कर विभागाच्या सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून बदली झाली असून, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या मोठ्या फेरबदलांमुळे मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 427
आयएएस बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.