Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणी ठोठावली दोन वर्षाची शिक्षा; खासदारकीवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह
न्यायालय

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणी ठोठावली दोन वर्षाची शिक्षा; खासदारकीवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह

गांधी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 23, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सुरत:
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणी दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या खासदारकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

खासदार गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा करताना न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्यावेळी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यावर आज निकाल देताना गांधी यांना दोषी ठरवल आहे. गांधी यांना दोषी ठरविल्यानंतर अवघ्या वीस मिनिटात त्यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

चार वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. खासदार राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून टिप्पणी करताना “चोरों का सरनेम मोदी क्यू होता है” असे विधान केले होते. गांधी यांच्या या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. न्यायालयाच्या निकालानंतर हे विधान गांधी यांना आता चांगलेच भोवले आहे.

नेमके काय प्रकरण होते
2019 च्या लोकसभा निवडणुकी वेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकामध्ये मोठी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच निरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांची आडनाव एकसारखी कशी? सर्व चोरांची आडनावे मोदी असतात का? असा सवाल केला होता. गांधी यांच्या या विधानावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात गांधी समुदायाचा अपमान झाल्याचा मानहानीचा दावा दाखल केला होता. यावर सुरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधी यांच्या विरोधात निकाल देत त्यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

न्यायालयात गांधी म्हणाले होते…
सुनावणी दरम्यान राहुल गांधींनी न्यायालयात सांगितले की, अशी टिप्पणी करण्यात माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. माझ्या विधानामुळे कोणाचही नुकसान झालेल नाही. त्यामुळे आपल्याला कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 421
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026

व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि…

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.